Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा 'यु-टर्न'; वाचा सविस्तर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Sarabjit Kaur Pakistan deportation update Jan 2026 : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चेत असलेल्या सरबजीत कौर (Sarabjit Kaur) प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. गुरुनानक देव यांच्या प्रकाश पर्वासाठी पाकिस्तानात गेलेल्या आणि तिथेच राहून निकाह करणाऱ्या सरबजीत कौरला (नूर फातिमा) भारतात परत पाठवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने तूर्तास लांबणीवर टाकला आहे. वाघा सीमेवर सर्व तयारी पूर्ण झाली असतानाही, गृह मंत्रालयाने ‘एक्झिट परमिट’ जारी करण्यास नकार दिल्याने सरबजीतचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी झाले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये सरबजीत कौर एका शीख जथ्थ्यासोबत पाकिस्तानात गेली होती. १० दिवसांची यात्रा संपवून जथ्था भारतात परतला, पण सरबजीत मात्र गायब झाली. नंतर धक्कादायक माहिती समोर आली की, तिने शेखपुरा येथील नासिर हुसैन याच्याशी निकाह केला असून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिचे नाव आता ‘नूर फातिमा’ असे आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती पाकिस्तानात राहिल्यामुळे तिला ४ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, सरबजीतला ५ जानेवारी रोजी भारताच्या स्वाधीन केले जाणार होते. मात्र, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने याला आक्षेप घेतला. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सरबजीतच्या निकाह आणि नागरिकत्वाबाबत लाहोर उच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. “प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिला इतक्यात भारताकडे सोपवता येणार नाही,” अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
#Breaking: Pakistani authorities have arrested Indian Sikh pilgrim Sarbjeet Kaur (50) from Punjab & her husband Nasir Hussain near Nankana Sahib for visa violations. She overstayed after a Nov 2025 pilgrimage, reportedly converted to Islam as Noor Hussain & married locally.… https://t.co/Fqo5zC16iP pic.twitter.com/uSvoASbXmm — Ravinder Singh Robin (@rsrobin1) January 5, 2026
credit : social media and Twitter
सरबजीत कौर सध्या लाहोरमधील ‘दारुल अमान’ (आश्रय गृह) मध्ये आहे. ९ जानेवारी २०२६ रोजी तिची विशेष वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आढळले. तिचे वकील अली चंगेझी संधू यांनी सांगितले की, “सरबजीतला भारतात पाठवण्यासाठी ‘स्पेशल ट्रॅव्हल परमिट’ची गरज आहे. हे परमिट व्हिसा संपलेल्या परदेशी नागरिकांसाठी वापरले जाते. अद्याप गृह मंत्रालयाने हे परमिट जारी केलेले नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर
सरबजीतने न्यायालयात सांगितले आहे की तिने आपल्या मर्जीने लग्न केले असून ती पाकिस्तानातच राहू इच्छिते. मात्र, व्हिसा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तिला भारतात परतणे अनिवार्य आहे. वकिलांच्या मते, एकदा तिला भारतात पाठवले की, ती तिथून ‘स्पouse व्हिसा’ (पतीच्या आधारे मिळणारा व्हिसा) घेऊन पुन्हा कायदेशीररीत्या पाकिस्तानात येऊ शकते. मात्र, सध्या गृह मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय तिला एक पाऊलही पुढे टाकता येत नाहीये.
Ans: तिला लाहोरमधील 'दारुल अमान' (Dar-ul-Aman) या सरकारी महिला आश्रय गृहात कडक पोलीस संरक्षणाखाली ठेवले आहे.
Ans: पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 'एक्झिट परमिट' (Exit Permit) जारी केलेले नाही आणि लाहोर उच्च न्यायालयात हे प्रकरण अद्याप प्रलंबित असल्याने हा निर्णय घेतला आहे.
Ans: कायदेशीर प्रक्रियेनुसार तिला भारतात परतावे लागेल. त्यानंतर ती कायदेशीर 'स्पouse व्हिसा' मिळवून पुन्हा पाकिस्तानात आपल्या पतीकडे जाऊ शकते.






