सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 (फोटो- ट्विटर)
गुजरातमध्ये सुरू आहे सोमनाथ स्वाभिमान पर्व
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’वर पंतप्रधान मोदींची पोस्ट
सोमनाथ मंदिरावर 1 हजार वर्षांपूर्वी झालेला हल्ला
सोमनाथ: गुजरातमधील सोमनाथ हे मंदिर अत्यंत लोकप्रिय असे मंदिर आहे. दरम्यान सध्या गुजरातमध्ये ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे केले जात आहे. 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर महमूद गझनवीने हल्ला केला. त्याचे यंदा एक हजारावे वर्ष आहे. दरम्यान या सोमनाथ स्वाभिमान पर्व वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी ओंकार मंत्राचा जप करणार आहेत. तसेच सोमनाथ ड्रोन शो चा आनंद घेणार आहेत. सोहळ्यात सहभागी होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिराबाबत एक व्हिडिओ शेयर केला आहे.
या व्हिडिओमध्ये,
गजनी, खिलजी, औरंगजेब आए आकर चले गए,
पर भोले बाबा के आगे, पापी सारे राख हुए।
अंत नहीं है, जिसका और कोई नहीं है शुरुआत,
सृष्टि के कण-कण में बसता वो है शंभु प्राणनाथ…!
भगवान श्री सोमनाथ सृष्टि के कण-कण में विराजते हैं। उनकी अखंड आस्था अनंत काल से निरंतर प्रवाहित हो रही है। वे सदैव भारत की आध्यात्मिक ऊर्जा के प्रतीक रहेंगे। pic.twitter.com/XounUARIFb — Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026
असे गाण्याचे गीत आहेत.
पंतप्रधान मोदींची पोस्ट काय?
सोमनाथ स्वाभिमान पर्व हे आपल्या आध्यात्मिक परंपरेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. जे देशभरात मोठ्या श्रद्धेने, भक्तिने, आनंदाने साजरे केले जाते. उद्या मला ओंकार मंत्रात सहभागी होण्याचे भाग्य मिळेल.
सोमनाथ स्वाभिमान पर्व हमारी आध्यात्मिक परंपरा का एक सशक्त प्रतीक है, जिसे देशभर में पूरी श्रद्धा, भक्ति और उल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी कड़ी में कल रात करीब 8 बजे सोमनाथ मंदिर में ओंकार मंत्र के दिव्य जाप का हिस्सा बनने का सौभाग्य मिलेगा। इसके अगले दिन सुबह लगभग 9:45 बजे… — Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026
त्यानंतर मला मंदिरात पूजा करण्याची संधि मिळेल. तसेच तेथील अन्य एका कार्यक्रमात मला सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त होईल.
बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
अमेरिकन लष्कराकडून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवरही टिकास्त्र सोडत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय प्रतिक्रियांची लाट उसळली आहे.
Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ






