• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Washim News Bus Accident 37 Passengers Rescued

Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

वाशिम जिल्ह्यातील सापळी फाट्यानजीक एसटी बस उलटल्याची घटना बुधवारी घडली. उमरखेड आगाराची बस ३७ प्रवासी घेऊन जात असताना अपघात झाला, मात्र सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 08:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग मार्गावर सापळी फाट्यानजीक बुधवारी (दि. ११) दुपारी एसटी बस उलटल्याची घटना घडली. उमरखेड आगाराची शेगाव ते उमरखेड दरम्यान धावणारी ही बस अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

एमएच-१४/बीटी ४३६२ क्रमांकाची ही बस वाशिम येथून उमरखेडकडे ३७ प्रवासी घेऊन निघाली होती. दुपारच्या सुमारास बस अनसिंगजवळील सापळी फाट्याजवळ पोहोचताच अचानक नियंत्रण सुटून उलटली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाड किंवा रस्त्याची परिस्थिती कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मदतीने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे बसमधील सर्व ३७ प्रवासी सुखरूप बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. किरकोळ दुखापत झालेल्या काही प्रवाशांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमरखेड आगाराचे वाहतूक नियंत्रक पांडुरंग यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत जखमी चालक संजय शिवदास धाये आणि वाहक धनेश्वर भाऊराव थाटबड्वे यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. दोघांची प्रकृती चिंताजनक नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

अपघातामुळे काही काळ वाशिम–अनसिंग मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर बस उलटल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र पोलिस आणि एसटी प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करण्यात आली आणि मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेनंतर एसटी प्रशासनाने अपघाताची चौकशी सुरू केली असून तांत्रिक तपासणीसाठी बस ताब्यात घेण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकूणच, मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ३७ प्रवाशांचे प्राण वाचल्याने ही घटना थोडक्यात निभावली असली तरी चालक-वाहकांच्या जखमी होण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Washim news bus accident 37 passengers rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई
1

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता
2

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
3

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.