
Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ
अशी माहिती समोर आली आहे की, Galaxy A-Series मधील बहुतेक स्मार्टफोन्सच्या किंमती 1 हजार रुपयांनी वाढू शकतात तर Galaxy A56 च्या किंमती 2 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ग्लोबल लेव्हलवर वेगाने बदलणाऱ्या टेक इंडस्ट्रीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनच्या किंमतीत वाढवण्यामागील कारण Galaxy A-Series ची वाढती मागणी किंवा सॅमसंगची नवीन पोझिशनिंग स्ट्रॅटेजी नाही. स्मार्टफोनच्या किंमती वाढण्यामागील खरे कारण म्हणजे जागतिक मेमरी मार्केटमध्ये सुरू असलेला गोंधळ असू शकतो.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रॅम आणि मेमोरी चिप्सची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. AI डेटा सेंटर्सला सामान्य कंज्यूमर डिव्हाईसच्या तुलनेच अनेक पटीने जास्त मेमोरीची गरज पडते. यामुळेच, सॅमसंग, एसके हायनिक्स आणि मायक्रोन सारख्या मोठ्या मेमरी कंपन्या आता त्यांची उत्पादन क्षमता AI आणि एंटरप्राइझ क्षेत्रांकडे वळवत आहेत, जिथे नफा जास्त आहे.
रिपोर्टनुसार, नोव्हेंबर महिन्यापासून DRAM च्या किंमती अतिशय वेगाने वाढत आहेत. स्मार्टफोन्समध्ये AI सर्वर्ससारख्या हाय-एंड मेमोरीचा वापर केला जात नसला, तरी देखील डिव्हाईस त्याच सप्लाय चेनवर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा सप्लायवर दबाव वाढतो. तेव्हा त्याचा परिणाम स्मार्टफोनच्या किंमतींवर देखील होतो. असाच परिणाम आता सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार असून त्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या
Micron ने फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांचा Crucial कंज्यूमर मेमोरी बिजनेस बंद करण्याची घोषणा केली, आणि यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. तोपर्यंत बाजारात क्रूशियल रॅम आणि एसएसडी उपलब्ध राहतील, परंतु मायक्रोनचे लक्ष आता स्पष्टपणे एआय आणि एंटरप्राइझ ग्राहकांवर आहे. या निर्णयामुळे कंज्यूमर मेमरी सेगमेंटमधील स्पर्धा कमी होईल, ज्यामुळे स्मार्टफोन, पीसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमती आणखी वाढू शकतात.
Ans: Samsung Galaxy फोन भारतासह व्हिएतनाम, कोरिया आणि इतर देशांमध्ये तयार केले जातात.
Ans: Samsung Galaxy फोनमध्ये One UI वापरले जाते, जे युजर-फ्रेंडली आणि फिचर्सने भरलेले आहे.
Ans: बहुतांश नवीन Galaxy फोनना 4 Android अपडेट्स आणि 5 वर्षे Security Updates दिले जातात.