Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या
Motorola Edge 70 भाररतात 29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी निवडक बँक कार्डसह या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट देत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच याव्यतिरिक्त, हा फोन कंपनीच्या भागीदार रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Motorola Edge 70 स्मार्टफोन पॅन्टोन ब्रॉन्झ ग्रीन, पॅन्टोन गॅझेट ग्रे आणि पॅन्टोन लिली पॅड रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Motorola Edge 70 officially launched in India🔥 ✨ Key Specs
📱 6.67″ 1.5K Flat AMOLED 1.5K GG7i
✨ Ultra-slim 5.99mm | Just 159g
📸 50MP (OIS) + 50MP Ultra-Wide+Macro
🤳 50MP Front Camera
⚡ Snapdragon 7 Gen 4 LPDDR5X| UFS 3.1
🔋 5000mAh Battery | 68W Fast Charge
🔌 15W… pic.twitter.com/YQc2uakcSa — Manoj Saru (@ManojSaru) December 15, 2025
Motorola Edge 70 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्स पर्यंत आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass 7i प्रोटेक्शन, Dolby Vision, आणि HDR10+ सपोर्टसह येतो.
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 4 चिपसेटसह, 8GB चे LPDDR5x रॅम आणि 256GB चे UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.
Android 16 वर आधारित Hello UI वप चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या स्मार्टफोनला 3 अँड्रॉईड मेजर अपग्रेड आणि 4 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट दिले जाणार आहे. Motorola चं असं म्हणणं आहे की, हा फोन Moto AI टूल्स, नेक्स्ट मूव्ह,कॅच मी अप 2.0, पे अटेंशन 2.0, रिमेंबर धिस प्लस रिकॉल, को-पायलट सारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे.
Motorola Edge 70 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS)चा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि थ्री-इन-वन लाइट सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन 60fps वर 4K रेजोल्यूशनवर व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये एआय व्हिडिओ एन्हांसमेंट, एआय अॅक्शन शॉट आणि एआय फोटो एन्हांसमेंट टूल्स देण्यात आले आहेत.
Motorola Edge 70 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची सिलिकन कार्बन बॅटरी दिली आहे. हा फोन सिंगल चार्जवर 31 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम देतो. फोनमध्ये 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन IP68 + IP69 रेटिंग आणि MIL-STD-810H मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटीसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन एयरक्राफ्ट-ग्रेड एल्यूमिनियम फ्रेमने सुसज्ज आहे.
Ans: Motorola ही मूळ अमेरिकन कंपनी आहे. सध्या ती Lenovo Group चा भाग आहे.
Ans: बहुतांश Motorola स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार केले जातात.
Ans: होय, Motorola फोनमध्ये जवळपास Stock Android (क्लीन UI) मिळतो, त्यामुळे फोन जलद आणि स्मूथ चालतो.






