Wikipedia Controversy: केंद्र सरकारची विकिपीडियाला नोटीस, प्रकरण चुकीची माहिती देण्याशी संबंधित! वाचा सविस्तर
विकिपीडिया जगभरातील लाखो लोक वापरतात. ही एक खुली वेबसाइट आहे, जिथे कोणीही माहिती अपडेट करू शकतो. हे प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे, परंतु आता प्लॅटफॉर्मने वापरकर्त्यांकडून पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. आजकाल भारतात विकिपीडियावर बंदी असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.ट
हेदेखील वाचा- TRAI देतोय तीन महिने मोफत रिचार्ज? 200GB डेटासह अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध! काय आहे सत्य, वाचा
अशातच आता भारत केंद्र सरकारने विकिपीडियाला नोटीस पाठवली आहे. हे संपूर्ण प्रकरण चुकीची माहिती देणे आणि पक्षपात करण्याशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही ANI या वृत्तसंस्थेच्या विकिपीडिया पेजचे चुकीचे एडीट केल्याबद्दल व्यासपीठाला फटकारले होते. या प्रकरणी विकिपीडियाला फटकारताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, जर एखाद्याला भारत आवडत नसेल तर तो देश सोडून जाऊ शकतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा विकिपीडियावर कारवाई करत केंद्र सरकारतर्फे प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
भारत सरकारने विकिपीडियाला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये गेल्या काही महिन्यांत विकिपीडियाविरोधात केलेल्या तक्रारी आणि पक्षपात यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. विकिपीडियाला चुकीच्या माहितीसाठी मध्यस्थ व्यतिरिक्त प्रकाशक का मानले जाऊ नये, याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. भारत सरकारने विकिपीडियाला पत्र पाठवून काही तक्रारींवर उत्तर देण्यास सांगितले आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी आशा आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विकिपीडियावर काय परिणाम होणार आणि विकिपीडिया भारतात बॅन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा- बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स
विकिपीडियाबाबत अनेक तक्रारी येत असल्याची माहितीही सरकारने दिली आहे. या नोटीसमध्ये केंद्र सरकारने म्हटलं आहे की, विकिपीडियाने पक्षपाताच्या अनेक तक्रारी आणि वेब पेजवर चुकीची माहिती दिली आहे. विशेषत: विकिपीडिया स्वतःचे वर्णन एक विनामूल्य ऑनलाइन विश्वकोश म्हणून करते, जेथे लोक स्वत: कोणत्याही समस्येवर किंवा विषयावर माहिती जोडू आणि एडीट करू शकतात. मात्र यामुळे लोकांपर्यंत चुकीची माहिती पुरवली जात आहे, असं सांगण्यात येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याचे विकिपीडिया पेज चुकीच्या पद्धतीने एडीट केले गेले असेल आणि कंपनी त्याचे समर्थन करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले की, जर विकिपीडिया स्वत:ला मध्यस्थ म्हणत असतील तर तुम्हाला यात काय अडचण येत आहे. मात्र आता यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चुकीच्या माहितीसाठी विकिपीडियाला मध्यस्थ व्यतिरिक्त प्रकाशक का मानले जाऊ नये, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एएनआयचे विकिपीडिया पेज कोणीतरी एडीट केले आणि हे सरकारचे प्रचाराचे साधन आहे, असं त्या पेजमध्ये लिहीण्यात आलं होतं. यामुळे हा संपूर्ण वाद सुरु झाला. यासोबतच विकिपीडिया पेजवर अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने एडीट करण्यात आल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते की, ज्यांनी एएनआयचे विकिपीडिया पेज चुकीच्या पद्धतीने एडीट केले आहे, त्यांची नावे जाहीर करावीत. मात्र विकिपीडियाने तसे करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणी विकिपीडियाला नोटीस पाठवण्यात आली असून सरकारने विकिपीडियाला या नोटीसीला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
wiki आणि encyclopedia या शब्दांनी बनलेला विकिपीडिया वापरकर्त्यांना मोफत माहिती देतो. विकिपीडियाची सुरुवात 2001 साली झाली. जिमी वेल्स, लॅरी सेंगर यांनी त्याची सुरुवात केली. हे 2003 साली हिंदीतही लाँच करण्यात आले. माहितीनुसार, दर महिन्याला 1.7 अब्ज युजर्स माहितीसाठी विकिपीडियाचा वापर करतात. या वापरकर्त्यांना सामग्री एडीट करण्याची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे अनेक वेळा लोक येथे चुकीच्या गोष्टी एडीट करतात.