(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी सीझन ६चा सातवा आठवडा सुरू झाला आहे. हळूहळू घरातील गेम आणखी मनोरंजक होत चालला आहे. या सीझनमध्ये पॉवर key सर्वात महत्त्वाची आहे. याचा अंदाज सदस्यांना पहिल्याच दिवशी आला होता. याआधी ही घरात पॉवर key मुळे घरात राडा झाला होता. आता सातव्या आठवड्यात देखील या पॉवर key मुळे गोंधळ उडाला आहे. आपल्याला मिळालेली कोणत्याही स्वरूपाची पॉवर आपण स्वत:सांभाळची आहे. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा करून चालणार नाही, असं बिग बॉसने या आधीही स्पष्टपणे सर्वांना सांगितले होते. आता हीच गोष्टी घरात घडली आहे.
प्राजक्ताला गेल्या आठवड्यात पॉवर key मिळावली जी आता प्रभूने मोठ्या हुशारीने स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. पॉवर key गायब झाल्यापासून प्राजक्ताचा गोंधळ उडाला होता.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये उघड झाले आहे की प्राजक्ताची पॉवर की प्रभूने चोरली होती. बिग बॉस म्हणतात की ज्या कोणी प्राजक्ताची पॉवर की चोरली असे त्यांना सगळे पॉवर keyचे अधिकार मिळतील. मग प्रभू चोरलेली चावी बाहेर काढतो. हे पाहून प्राजक्ता रागाच्या भरात त्याला सतत तू चोर आहेस तू चोर आहेस म्हणून हिणवत असते. यावादात पुढे एन्ट्री रोशनची होते. तो सुद्दा प्रभूला Power key का चोरली याचा जाब विचारतो. वाद वाढल्यानंतर रोशन प्रभूच्या अंगावर धावून जातोय यावेळी राखी त्याला अडवते. आता या चावीवरून घरात काय गोंधळ उडणार? नवीन आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात पुढे काय घडणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहून छोटा डॉन प्रभूचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या प्रोमोवर कमेंटसचा पाऊस पाडला आहे. ”नियमांनुसार प्रभूचं बरोबर आहे कारण बिग बॉसने आधीच power key जपून ठेवा असे आदेश दिले होते. ” , ” प्रभू एक नंबर भावा”, वाह प्रभू मस्त गेम केलास.” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी प्रोमोवर दिल्या आहेत.






