बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स
बनावट पेमेंट ॲप्सचा समावेश असलेल्या फसवणुकीचा एक भयानक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, ज्याबद्दल व्यापाऱ्यांनी जागरूक असणं गरेजचं आहे. या ट्रेंडमध्ये कायदेशीर पेमेंट ॲप्लिकेशनची नक्कल करून बनावट पेमेंट ॲप्स तयार केले जात आहेत. हे बनावट पेमेंट ॲप्स UI, रंगांच्या स्कीम आणि एकूण स्वरूपाशी एकदम साधर्म्य ठेवतात. त्यामुळे खरे पेमेंट ॲप्स आणि बनावट पेमेंट ॲप्स यांच्यामध्ये फरक ओळखणं फार कठीण आहे.
हेदेखील वाचा- TRAI देतोय तीन महिने मोफत रिचार्ज? 200GB डेटासह अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध! काय आहे सत्य, वाचा
पहिल्यांदा पाहता क्षणी दोन्ही ॲप्स अगदी एकसारखे वाटू लागतात. त्यामुळे कोणता ॲप खरा आहे आणि कोणता ॲप बनावट आहे, हे ओळखता येत नाही. यापैकी काही फसवी ॲप्स पेमेंट मिळाल्याची खोटी सूचना देण्यासाठी पेमेंट नोटिफिकेशनच्या आवाजाचेही अनुकरण करतात आणि लोकांना गोंधळात टाकतात. तसेच ते व्यवहार यशस्वी झाला आहे, हे दाखवण्यासाठी खात्रीशीर पेमेंटची माहिती देऊ शकतात. त्यामुळे हे ॲप्स बनावट आहेत, अशी लोकांना शंका येत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
पण या बनावट ॲप्समुळे लोकांचे मोठं नुकसान होतं, हे मात्र खरं आहे. बनावट पेमेंट ॲप्सचा हा ट्रेंड सध्या व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बनावट ॲप्सपासून व्यापाऱ्यांनी स्वत:ला कशाप्रकारे सुरक्षित ठेवावं, यासाठी फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी शेअर केलेल्या या टीप्स व्यापाऱ्यांना बनावट पेमेंट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करणार आहेत. बनावट पेमेंट ॲप घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यापाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत.
हेदेखील वाचा- BSNL लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन? कंपनीने सोशल मिडीयावर केला खुलासा






