फोटो सौजन्य - pinterest
20 जुलै पासून Amazon Prime Day Sale 2024 सुरु होणार आहे. या सेलची सर्वचजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. Amazon Prime Day Sale मध्ये कंपनी अनेक डील आणि वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देणार आहे. गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंपासून फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टी Amazon प्राइम सदस्यांना स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. पण हा सेल सुरु होण्याआधीच सायबर स्कॅमर अॅक्टिव्ह झाले आहेत. Amazon Prime Day Sale 2024 पूर्वीच सायबर स्कॅमरकडून ग्राहकांची लूट सुरु आहे.
हेदेखील वाचा – तुम्ही Amazon सेलमधून खरेदी करत असाल तर काळजी घ्या; तुमची छोटीशी चूक सुध्दा महागात पडू शकते
सायबर स्कॅमरकडून लोकांच्या फोनवर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवल्या जात आहेत, ज्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं बँक अकाऊंट काही क्षणातच रिकामं होऊ शकतं. या प्रत्येक लिंकमध्ये Amazon चं नाव वापरण्यात आलं आहे. त्यामुळ कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहा. सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉईंटने याचा खुलासा केला आहे. चेकपॉईंटने अशा 25 लिंक्सची यादी जाहीर केली आहे. ज्यामुळे नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते. सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉईंटने म्हटलं आहे की, ॲमेझॉनवर 20 जुलैपासून सेल सुरु होणार आहे आणि अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारांना संधीचा फायदा घ्यायचा आहे. त्यांनी अनेक बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना आर्थिक अडचणीत येऊ शकते. ॲमेझॉनशी संबंधित अशा 25 वेबसाइट्सचा खुलासा करण्यात आला आहे, ज्यावर लोकांना क्लिक करू नये.
हेदेखील वाचा – Tata Play Binge ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन! युजर्सना मिळणार अनलिमिटेड फायदे
सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी या मॅसेजचा वापर करतात. हा मॅसेज व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इमेल इत्यादीव्दारे लोकांपर्यंत पोहोचवला जातो. यामध्ये शॉपिंग ॲप Amazon च्या नावाने ऑफर्स देण्यात आल्या असून बंपर डिस्काउंट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हॅकर्स या माहितीचा फायदा घेत डेटा गोळा करतात आणि बँक खात्यातून पैसे काढतात.
यापूर्वी देखील चेकपॉईंट ने अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, Amazon Prime Day Sale ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. कारण आपली एक चूक आणि आपण सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकतो. Sale दरम्यान सायबर गुन्हेगार ॲमेझॉनच्या बनावट वेबसाइट तयार करतात. सायबर गुन्हेगार ग्राहकांकडून माहिती गोळा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यानंतर ग्राहकांना बनावट संदेश पाठवले जातात, ज्यामध्ये बनावट ऑफरची माहिती असते. ज्यामुळे अनेक युजर्स त्यांच्या बनावट वेबसाईटला भेट देतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात. सायबर गुन्हेगार त्यांच्या बनावट वेबसाईटवर भरघोस डिस्काउंट आणि मोठमोठ्या ऑफर्स दाखवतात. ज्यामुळे लोकं त्यांच्या वेबसाईटकडे आकर्षित होतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात.