Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’

Technology News: 'डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरण वापरण्याचे कौशल्य नाही. समोरची माहिती कुठून आली, तिची सत्यता कशी तपासायची आणि आपली माहिती कुठे द्यायची नाही, याचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे,' असे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2026 | 02:35 AM
मोबाईल स्मार्ट... पण आपण किती?

मोबाईल स्मार्ट... पण आपण किती?

Follow Us
Follow Us:

‘डिजिटल साक्षरता’ची व्याख्याच बदलताना दिसून
‘डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरण वापरण्याचे कौशल्य नाही
२०२५ मध्ये पुणे शहरात ७४३ सायबर गुन्ह्यांची नोंद

सुनयना सोनवणे / पुणे: मोबाईल हाताळता येतो, यूपीआयवरून पैसे पाठविता येतात, ऑनलाइन खरेदी करता येते म्हणजे आपण डिजिटल साक्षर झालो, असे समजण्याची वेळ आता मागे पडली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीपफेक, बनावट संकेतस्थळे आणि खोटी माहितीच्या वाढत्या वापरामुळे ‘डिजिटल साक्षरता’ची व्याख्याच बदलत आहे. मोबाईलवर आलेला संदेश, फोटो, व्हिडिओ किंवा आवाज खरा आहे की कृत्रिम पद्धतीने तयार केलेला, हे ओळखणे हीच आता डिजिटल साक्षरतेची नवी कसोटी ठरत आहे.

पुण्यासारख्या तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर असलेल्या शहरात ही गरज अधिक जाणवते. ऑनलाइन बँकिंगपासून सरकारी सेवांपर्यंत बहुतांश व्यवहार मोबाईलवर आले आहेत. त्याचवेळी नागरिकांची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि आवाज यांचा वापर करून विश्वास निर्माण करण्याचे नवे मार्गही तयार झाले आहेत.

‘डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरण वापरण्याचे कौशल्य नाही. समोरची माहिती कुठून आली, तिची सत्यता कशी तपासायची आणि आपली माहिती कुठे द्यायची नाही, याचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?

डिजिटल साक्षरतेची नवी कसोटी

पूर्वी : मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार वापरता येणे.

आता :
* एआय निर्मित फोटो-व्हिडिओ ओळखणे
* डीपफेक आणि बनावट आवाजाची शक्यता तपासणे
* बनावट संकेतस्थळ व संदेश ओळखणे
* सामाजिक माध्यमांवरील माहितीची पडताळणी करणे
* ॲपला दिल्या जाणाऱ्या परवानग्या समजून घेणे
* पासवर्ड, पासकी आणि बहुपदरी सुरक्षा वापरणे

‘क्लिक’ करण्याआधी स्वतःला विचारावेत असे प्रश्न

– ही माहिती कुठून आली?
– वेबसाइट अधिकृत आहे का?
– फोटो किंवा व्हिडिओ खरा आहे का?
– समोरची व्यक्ती खरोखर तीच आहे का?
– विशेषतः ‘ताबडतोब पैसे पाठवा’, ‘खाते बंद होणार’, ‘ही संधी शेवटची’ अशा संदेशांमध्ये घाई न करता स्वतंत्रपणे माहिती तपासणे आवश्यक आहे.

Samsung Galaxy AI: गॅलेक्सी एआयच्या जागतिक विकासात भारताचे वाढते योगदान; नोएडा आणि बेंगळुरू आरअँडडी केंद्रांची महत्त्वाची भूमिका

पुण्याची सायबर वास्तवता

२०२५ मध्ये पुणे शहरात ७४३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून नागरिकांचे सुमारे २२१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे डिजिटल कौशल्याबरोबरच डिजिटल सुरक्षिततेचे भानही आवश्यक झाले आहे.

आज प्रश्न ‘मोबाईल वापरता येतो का?’ एवढाच राहिलेला नाही. मोबाईलवर दिसणारी माहिती खरी आहे की नाही, हे ठरवता येते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः एआयमुळे तयार होणाऱ्या बनावट मजकूर, चित्र, आवाज आणि व्हिडिओच्या काळात माहितीची पडताळणी करण्याची सवय प्रत्येकाने लावणे गरजेचे आहे.
– विनीत गायकवाड, तंत्रज्ञान तज्ञ

Web Title: Deepfake fraud artificial intelligence redefining digital literacy cyber crime tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Digital Payment
  • pune news
  • technology news
  • UPI payment

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
2

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…
3

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
4

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.