
Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नवीन Dell Pro 3, Pro 5, Pro 7 हे लॅपटॉप, Pro Precision 9 Tower वर्कस्टेशन, एक नवीन रॅक वर्कस्टेशन, नवीन मॉनिटर्स आणि एक 4K वेबकॅम. कंपनीचं म्हणणं आहे की हे सगळे प्रोडक्ट ऑफिसमधलं काम सोपं करण्यासाठी आणि AI चं काम थेट लॅपटॉपवरच करण्यासाठी बनवले आहेत. क्लाऊडवर जाण्याची गरज नाही.Dell Launches New Al PCs:
Dell ने आपली Pro सिरीज तीन भागात आणली आहे. Pro 3, Pro 5 आणि Pro 7.यात Intel Core Ultra Series 3 आणि AMD Ryzen AI 400 प्रोसेसरचा ऑप्शन मिळेल. हे सगळे लॅपटॉप On-Device AI ला सपोर्ट करतात, म्हणजे Copilot सारखे फीचर्स थेट लॅपटॉपवर चालतील.
Pro 7 हा सगळ्यात प्रीमियम आहे. हा १३ आणि १४ इंचात येतो, यात 2-in-1 चा पण ऑप्शन आहे. काही मॉडेलमध्ये OLED डिस्प्ले, ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि Mini-LED कीबोर्ड पण आहे. कंपनी सांगते की १३ इंचाचा Pro 7 हा आधीच्या मॉडेलपेक्षा १८% जास्त पातळ आहे.
Pro 5 हा १४ आणि १६ इंचात येतो. यात Intel आणि AMD दोन्हीचे ऑप्शन आहेत. तसेच मेगापिक्सलचा HDR कॅमेरा, ४०० आणि ५०० Nits चे डिस्प्ले ऑप्शन आणि OLED स्क्रीन मिळते. यात ७०Wh ची मोठी बॅटरी दिली आहे.
Pro 3 हा सगळ्यात हलका आणि स्वस्त पर्याय आहे. हा पण १४ आणि १६ इंचात येतो. याचं वजन फक्त १.३१ किलो पासून सुरू होतं आणि यात Wi-Fi 7 चा सपोर्ट आहे. काही मॉडेलमध्ये २३ तासांपर्यंत बॅटरी टिकेल असा दावा Dell ने केला आहे.
साध्या लॅपटॉपवर जड कामं होत नाहीत, जसं की AI ट्रेनिंग, मोठं रेंडरिंग, इंजिनिअरिंग सिम्युलेशन. त्यासाठी Dell ने Precision 9 सिरीज आणली आहे. यात T3, T4 आणि T6 टॉवर वर्कस्टेशन आहेत.
यात ८६ कोअर पर्यंतचे Intel Xeon 600 सिरीज प्रोसेसर आणि Nvidia RTX Pro Blackwell ग्राफिक्स मिळतात. T6 मॉडेलमध्ये तर १५ PCIe स्लॉट आणि ५ ग्राफिक्स कार्ड लावू शकता. यात ३१६ TB पर्यंत स्टोरेज लावता येतं. म्हणजे हे एक छोटा सर्व्हरच आहे. इंजिनिअर, आर्किटेक्ट, डिझायनर आणि AI डेव्हलपर्ससाठी हे बनवलं आहे.
याशिवाय Dell ने 7 R1 हा रॅक वर्कस्टेशन पण आणला आहे. हे ऑफिसमध्ये एका ठिकाणी ठेवायचं आणि सगळे लोक रिमोटली त्याचा वापर करू शकतात. यात १२८ GB पर्यंत RAM आणि ६४ TB स्टोरेज मिळतं.
Dell ने दोन नवीन मॉनिटर पण लॉन्च केले.पहिला आहे Dell Pro 43 Plus 4K. हा ४३ इंचाचा मोठा मॉनिटर आहे जो मीटिंगसाठी बनवला आहे. यातच सोनीचा ८ मेगापिक्सल 4K कॅमेरा, ४ माइक आणि २ मोठे स्पीकर आहेत. यात AI ग्रुप फ्रेमिंग आहे, म्हणजे मीटिंगमध्ये सगळ्यांना ऑटोमॅटिक फ्रेममध्ये घेतं. हा Zoom Rooms साठी सर्टिफाईड आहे.
दुसरा आहे Dell Ultrasharp 32 4K QD-OLED. हा क्रिएटर्ससाठी आहे. ३१.५ इंचाचा 4K डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision सपोर्ट आणि ९९% DCI-P3 कलर. यात अंगभूत कलरमीटर पण आहे.
Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा
शेवटी Dell Pro 7 Webcam 4K. हा वेबकॅम ६०fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करतो. यात AI ऑटो-फ्रेमिंग, फेस ट्रॅकिंग, ऑटोफोकस आहे. कंपनीने सांगितलं की या सगळ्या बिझनेस लॅपटॉपमध्ये Dell Trusted Workspace नावाचं सिक्युरिटी फीचर दिलं आहे. BIOS पासून ते ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत सगळीकडे प्रोटेक्शन मिळेल.