Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपनी घेऊन आली 33 रुपये नवा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी
टेलिकॉम कंपनी Airtel ने त्यांच्या यूजर्ससाठी एक बजेट प्लॅन सादर केला आहे. खरं तर हा प्लॅन खूपच स्वस्त आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 40 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने असा एका प्लॅन लाँच केला आहे, ज्याचा वापर युजर्स त्यांच्या गरजेनुसार करू शकणार आहेत. खरं तर कंपनीच्या रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये अनेक असे ऑप्शन उपलब्ध आहे, ज्यामध्ये युजर्सना केवळ डेटा बेनिफिट ऑफर केला जातो. त्यामुळे हे रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी नक्कीच फायद्याचे ठरतात.
तुम्ही देखील Airtel युजर असाल आणि अशा एखाद्या डेटा प्लॅनच्या शोधात असाल ज्याची किंमत देखील कमी असेल आणि ज्यामध्ये कॉल किंवा एसएमएस सारख्या सुविधांची गरज नसेल तर कंपनीने कंपनीचा हा नवीन रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. तुम्हाला केवळ इंटरनेटची गरज असेल तर कंपनीचा 33 रुपयांचा डेटा प्लॅन एक चांगला ऑप्शन ठरणार आहे.
Airtel चा हा 33 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खासकरून अशा लोकांसाठी बेस्ट असणार आहे ज्यांच्याकडे आधीच रिचार्ज प्लॅन आहेत, मात्र त्यातील डेली डेटा लिमिट संपली आहे किंवा युजर्सना जर जास्तीच्या डेटाची गरज असेल तर ते या रिचार्ज प्लॅनचा वापर करू शकतात. अशा यूजर्सना या टॉप-अप पॅकमधून दिलासा मिळू शकतो कारण तो कमी किमतीत हाय-स्पीड डेटा प्रदान करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 2GB डेटा ऑफर केला जातो. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिटीडी केवळ 1 दिवसाची आहे. म्हणजेच हा प्लॅन केवळ त्या एकाच दिवसासाठी व्हॅलिड असणार आहे, जेव्हा तुम्ही तो एक्टिवेट कराल. यानंतर जर रिचार्ज प्लॅनमधील डेटा उरला, तर तो दुसऱ्या दिवसासाठी ट्रांसफर केला जाणार नाही. लक्षात ठेवा की या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्सचा समावेश नाही. हा केवळ एक डेटा टॉप-अप पॅक आहे. इंटरनेट ब्राउजिंग, सोशल मीडिया आणि व्हिडीओ पाहण्यसाठी जेव्हा अतिरिक्त डेटाची गरज भासते तेव्हा या रिचार्ज प्लॅनचा वापर केला जाऊ शकतो.
तुम्ही हा प्लॅन एअरटेल थँक्स अॅप, एअरटेल वेबसाइट, पेटीएम, फोनपे किंवा जवळच्या कोणत्याही रिचार्ज रिटेलरद्वारे सक्रिय करू शकता. एकंदरीत, एअरटेलचा हा 33 रुपयांचा डेटा प्लॅन दिवसभर वारंवार इंटरनेट वापरणाऱ्या आणि त्यांची दैनंदिन मर्यादा लवकर संपवणाऱ्यांसाठी परिपूर्ण आहे. हा एका दिवसापुरता मर्यादित आहे, परंतु कमी किमतीत जलद इंटरनेट अॅक्सेससाठी हा एक परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय आहे.