आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. अनेकजण इंटरनेट वर बरेच सक्रिय असतात. त्यातच आता इंटरनेटशी जोडलेल्या अनेक गोष्टी दिवसेंदिवस समोर येत आहेत. इंटरनेटवर होणारी फसवणूक आणि सायबर हल्ला यांचा धोका वाढतच चालला आहे. दरवर्षी अनेक लोक अशा सायबर हल्ल्यांना बळी पडत असतात.लोक त्यांचे बँक कार्ड, फोन आणि इतर गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी पिन नंबर तयार करतात. मात्र, बरेच लोक यात निष्काळजीपणा करतात आणि स्ट्रॉग पिन सेट करत नाहीत. नुकत्याच झालेल्या सायबर सुरक्षा अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, बहुतेक लोक त्यांचा पिन क्रमांक ‘1234’ असा ठेवतात.
मिळालेल्या अहवालानुसार, अनेक लोक त्यांचा संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी साधे पिन क्रमांक निवडतात. अहवालात असे म्हटले आहे की तपासलेल्या पिन क्रमांकांपैकी सुमारे 11 टक्के पिन ‘1234’ असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय ‘1111’, ‘0000’, ‘1212’ आणि ‘7777’ सारखे साधे पिन नंबर देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. डेटा जेनेटिक्सच्या अभ्यासात एकूण ३४ लाख पिन क्रमांकांची तपासणी करण्यात आली. डेटा चोरीच्या घटनांमध्ये हे पिन क्रमांक उघडकीस आलेले आहेत. अनेकांनी त्यांच्या पिन नंबरमध्ये सोपा पॅटर्न वापरल्याचे दिसून आले आहे.
[read_also content=”ChatGPT 4o चे निर्माता प्रफुल्ल धारीवाल कोण आहेत? सॅम ऑल्टमन ने ही केले कौतुक Navarashtra News Network Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम https://www.navarashtra.com/technology/who-is-prafulla-dhariwal-creator-of-chatgpt-4o-sam-altman-praised-it-534579.html”]
अधिकतम वापरले जाणारे ४ अंकी पिन
बहुतेक लोक त्यांच्या फोनवर चार-अंकी साधा पिन सेट करतात, ज्यामध्ये 1234, 1111, 0000, 1212, 7777, 1004, 2000, 4444, 2222, 6969 यांचा समावेश आहे. हॅकर्सना असे पिन क्रॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि त्यामुळेच अनेकांचा पिन हा हॅकर्सद्वारे सहज हॅक केला जातो.
काय म्हणाले सायबर सुरक्षा तज्ज्ञ?
सायबर सुरक्षा तज्ज्ञ जेक मूर यांनी या परिणामांबाबत सावधानगिरीचा इशारा दिला आहे. साधे पिन नंबर वापरल्याने चोरांना लोकांना टार्गेट करणे सोपे जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाला की, लोक कमकुवत पासवर्ड आणि पिन नंबर वापरून स्वतःला धोक्यात आणतात. अनेकदा फसवणूक होईपर्यंत त्यांना या धोक्याची जाणीवही होत नाही. जेक मूर यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, खराब सायबर सुरक्षा सवयी हॅकर्सचे काम सोपे करतात. लोक सहसा पिन नंबर वापरतात जे सामान्य किंवा त्यांच्यासाठी लक्षात ठेवण्यास सोपे असतात, जसे की वाढदिवसाची तारीख.






