एका तलाठ्यावर १० गावांचा डोंगर! देवगड महसूल प्रशासनाचा कारभार देवाच्या भरवशावर
मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०२१ पासून गढीताम्हाणे आणि रहाटेश्वर या सज्जांचा भारही त्यांच्याकडेच आहे. त्यातच आता मागील ३ महिन्यांपासून वानिवडे आणि पावणाई या गावांचीही जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.
Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली
१० गावातील नागरिकांना कामासाठी मोंड येथे चकरा माराव्या लागतात, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे. तलाठ्यांकडे लॅपटॉप आणि प्रिंटर यांसारख्या मूलभूत साधनांची कमतरता आहे.
गढीताम्हाणे, रहाटेश्वर, वानिवडे आणि पावणाई या भागात नेटवर्क नसल्याने ऑनलाईन कामे ठप्प आहेत. राउटर वापरूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावोगावी फिरताना नागरिकांनी या समस्यांचा पाढा साळसकर यांच्यासमोर वाचला. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी आणि सामान्य जनता भरडली जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा
या समस्यांवर येत्या ८ दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढून प्रशासनाने लेखी अहवाल सादर करावा. जर येत्या ४ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर १० गावातील ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिला आहे. यामुळे आता महसूल विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






