Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल
किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा
मोटोरोला रेझर अल्ट्रा 2026 ची किंमत 1,499.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,43,000 रुपये आहे. स्मार्टफोन लवकरच युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. कंपनीने हा स्मार्टफोन पॅनाटोन कोको आणि पॅनाटोन ओरिएंट ब्लू या रंगात सादर केला आहे. मोटोरोला रेझर प्लस 2026 ची किंमत 1,099.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,05,000 रुपये आणि मोटोरोला रेझर 2026 ची किंमत 799.99 डॉलर म्हणजेच सुमारे 76,000 रुपये ठेवली आहे. मोटोरोलाने लाँच केलेल्या या फोल्डेबल सिरीजची प्री ऑर्डर 14 मे पासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Motorola)
मोटोरोलाचा हा अल्ट्रा फोल्डेबल फोन 7 इंचाच्या एक्सट्रीम अमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे. यामध्ये डॉल्बी विजन सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50MP चा मुख्य आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50MP चा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4 इंच कवर डिस्प्ले मिळणार आहे, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कवर डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत आहे. अल्ट्रा फोल्डेबल फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 68W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोला रेझर प्लस 2026 आणि मोटोरोला रेझर 2026 हे दोन्ही स्मार्टफोन्स 6.9 इंच एक्सट्रीम अमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहेत. फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आहे आणि हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या दोन्ही फोनमध्ये 3.6 इंच कवर डिस्प्ले दिला आहे. मोटोरोला रेझर प्लसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे. तसेच, मोटोरोला रेझर 2026 मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7450x चिपसेट दिले आहे, ज्यासोबत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही फोल्डेबल फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये 32MP चा कॅमेरा मिळणार आहे. मोटोरोला रेझर प्लस 2026 मध्ये 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी दिली आहे. मोटोरोला रेझर 2026 मध्ये 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,800mAh बॅटरी दिली आहे. मोटोरोलाचे हे सर्व फोल्डेबल फोन अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.






