Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

Smartphone Screen Setting: स्मार्टफोन आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, तासन्तास स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. सुदैवाने, फोनमधील काही सोप्या सेटिंग्ज बदलून तुम्ही डोळ्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 07:00 AM
Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

Follow Us
Follow Us:
  • ऑटो ब्राइटनेस किंवा कमी ब्राइटनेसचा वापर केल्याने अंधारात स्क्रीनचा डोळ्यांवरील ताण कमी होतो.
  • झोपण्यापूर्वी ब्लू लाइट फिल्टर आणि डार्क मोड सुरू केल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
  • फोन डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवणे आणि स्क्रीन डिस्टन्स सारख्या फीचरचा वापर केल्याने डोळ्यांवरील दबाव कमी होतो.
गेम खेळण्यापासून जगभरातील अपडेट मिळवण्यापर्यंत आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून एखाद्याला कॉल करण्यापर्यंत सर्व कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. अनेकांना कामासाठी सतत स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहावे लागते. काही लोकांना सतत 6 ते 10 तास फोनच्या स्क्रीनकडे पाहावे लागते. ज्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोकेदुखी वाढते आणि नजर देखील कमजोर होते. पण या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनची काही सेटिंग बदलू शकता. ही सेटिंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

अंधारात स्क्रीन ब्राइटनेस कमी करा

प्रखर सूर्यप्रकाशात फोनचा वापर करताना स्क्रीन ब्राइटनेस अतिशय गरजेची असते. त्यामुळे यूजर्स ऊन्हात गेल्यानंतर स्क्रीन ब्राइटनेस वाढवतात. पण अंधारात फोनचा वापर करताना ही सेटिंग बदलणं गरजेचं आहे. अंधारात स्क्रीन ब्राईटनेस कमी केली तर तुमच्या डोळ्यांवर ताण येत नाही. मॉडर्न फोनमध्ये तुम्हाला ऑटो-ब्राइटनेस फीचर मिळणार आहे, जे आजूबाजूच्या प्रकाशाच्या हिशोबाने ब्राईटनेस ऑटोमॅटिक एडजस्ट करते. यामुळे ऊन्हात किंवा अंधारात सतत ब्राईटनेस ॲडजस्ट करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ऑटो ब्राईटनेसचा पर्याय निवडू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

झोपण्यापूर्वी ब्लू लाइट फिल्टर ऑन करा

सूर्याच्या किराणांमध्ये सुमारे 25 टक्क्यांपर्यंत ब्लू लाईट असते. हा प्रकाश तुम्हाला ऊर्जा देतो आणि दिवसभर सतर्क ठेवतो. तुमच्या फोनच्या स्क्रीनमधून देखील ब्लू लाईट बाहेर येते. ही लाईट सूर्याच्या प्रकाशा इतकी शक्तीशाली नसते. मात्र यामुळे तुमच्या झोपेत अडथळे येऊ शकतात. निळा प्रकाश दिसल्यानंतर मेंदूला झोप आणणारे हार्मोन, मेलाटोनिन, स्रवण्यापासून रोखले जाते. त्यामुळे जर तुम्ही झोपताना फोनचा वापर करत असाल तर ब्लू लाइट फिल्टर ऑन करा. यामुळे निळा प्रकाश फिल्टर होईल आणि तुमच्या मेंदूला झोप आणणारे हार्मोन स्रवण्यास मदत होईल.

डार्क मोड देखील करणार मदत

जर तुम्ही अंधारात स्मार्टफोनचा वापर करत असाल तर डार्क मोड चालू करा. यामध्ये टेक्स्ट पांढऱ्या रंगाचा आणि बॅकग्राऊंड काळ्या रंगाचे होते. यामुळे डोळ्यांवर पडणारा प्रकाश आणि डोळ्यांवरील ताण कमी होतो. डार्क मोडचा आणखी एक फायदा आहे, की यामध्ये बॅटरीचा वापर कमी केला जातो. यामुळे चार्जिंग देखील लवकर संपत नाही.

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा ‘ही’ सेटिंग

स्क्रीन अलर्ट डिस्टेंस

तुम्ही फार जवळून स्मार्टफोनची स्क्रीन पाहत असाल तर डोळ्यांवर ताण येऊ शकतो. यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल तितका फोन डोळ्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी आयफोनमध्ये ‘स्क्रीन डिस्टन्स’ नावाचे एक वैशिष्ट्य दिले आहे. जर तुम्ही फोन तुमच्या डोळ्यांपासून 12 इंचांपेक्षा कमी अंतरावर धरला, तर हे वैशिष्ट्य तुम्हाला सावध करेल.

Web Title: Feeling tired while looking at your phone change these smartphone settings for better eye comfort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
1

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
2

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
3

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
4

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.