Flipkart Scam: फ्लिपकार्ट स्कॅमने ग्राहक त्रस्त; डिलिव्हरीपूर्वीच ऑर्डर होतेय कॅन्सल (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्हाला आठवतयं का ई कॉमर्स प्लटफॉर्म फ्लिपकार्टवर फायरड्रॉप नावाची ऑफर सुरु होती. या ऑफरमध्ये तुम्ही कधी विचार देखील केला नसेल इकक्या स्वस्त किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध होते. ऑफरअंतर्गत अनेक ग्राहकांनी स्मार्टफोन ऑर्डर केले होते. मात्र डिलीव्हरी पूर्वीच ग्राहकांच्या या ऑर्डर कंपनीकडून कॅन्सल करण्यात आल्या. त्यामुळे कंपनीच्या या ऑफरवर ग्राहकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी फायरड्रॉप ऑफर सुरु करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित करत अनेक ग्राहकांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्टला टॅग करत पोस्ट केली आहे. तसेच या ग्राहकांनी त्यांच्या कॅन्सल झालेल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
Dear @Flipkart & @motorolaindia 🙌
😬We have very serious concerns about the firedrop 99% discount offer.
It’s Look Like Totally Scam with thousands of users😠
👇Look At here, what’s concern👇
A few months ago, Flipkart ran an event called Firedrop @0xFireDrops, where users… pic.twitter.com/WmkQOIFBUw
— Vaibhav Gupta (@VaibhavguptaTF) September 17, 2024
हेदेखील वाचा- फ्लिपकॉर्टने सुरु केली Flipkart Minutes सर्विस! आता 15 मिनिटांत मिळणार सामानाची डिलीवरी
ये फ्लिपकार्ट वाले लोगों के साथ धोखाधारी कर रहे हैं,
अरे भाई ये 1 लाख का #iPhone वो तुमको 1322 में कौन देगा?
और Motorola phone 222 में कहां से दे देगा।मेरी मानो तो दुकानदारों से सामान खरीदो लूटो ऑफर से नहीं
आप क्या कहते हैं?#flipkartscam pic.twitter.com/GDDB42hcuk— Ragni kumari (@ray_ragni) September 18, 2024
Hey @Flipkart @0xFireDrops what tf is this?
Should we file a case against you in consumer court? #flipkartscam pic.twitter.com/GaMYxbesbH— Jameel Ahmad (@JameelA88534245) September 18, 2024
फ्लिपकार्टच्या ‘फायरड्रॉप’ ऑफरमध्ये मोटोरोला G85 स्मार्टफोन 99% डिस्काउंटसह केवळ 179 रुपयांना उपलब्ध होता. तर मोटोरोला G85 5G केवळ 222 रुपयांना उपलब्ध होता. Apple Iphone 15 Pro Max 256 GB केवळ 1,352 रुपयांना उपलब्ध होता. अत्यंत दमदार ऑफर्स आणि कमी किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ऑर्डर केले. मात्र यावेळी ग्राहकांसोबत मोठा स्कॅम झाला. ऑर्डर केलेल्या स्मार्टफोन्सची डिलीव्हरी होण्याआधीच ते कॅन्सल करण्यात आले.
स्मार्टफोन 99% डिस्काउंटसह केवळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ग्राहकांच्या ऑर्डरची पडताळणी केल्यानंतरही त्या रद्द करण्यात आल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक संतापले आहेत. फ्लिपकार्टवर डिस्काउंटच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. बुधवारी सकाळपासूनच #FlipkartScam सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. असा आरोप आहे की ऑर्डरची कन्फर्म झाल्यानंतरही अनेक ग्राहकांच्या ऑर्डर कोणत्याही ठोस कारणाशिवाय रद्द करण्यात आल्या.
हेदेखील वाचा- Flipkart ने लाँच केले Super Money नावाचे पेमेंट ॲप! जाणून घ्या कसं काम करतं
फ्लिपकार्टच्या ग्राहक समर्थनाने याला विक्रेत्याची समस्या म्हटले आहे, परंतु ग्राहकांचं म्हणणं आहे की डिस्काऊंट विक्रेत्याने नव्हे तर फ्लिपकार्टने ऑफर केली होती. या प्रकरणाची जबाबदारी फ्लिपकार्टने घ्यावी, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता प्रकरणात फ्लिपकार्ट काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फ्लिपकार्टच्या विरोधात ग्राहकांचा रोष वाढला आहे. अनेक ग्राहकांनी फ्लिपकार्टकडे मागणी केली आहे की त्यांना एकतर समान डिस्काऊंट द्या किंवा किंमतीच्या किमान 50% नुकसान भरपाई द्या. सोशल मीडियावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी फ्लिपकार्टला इशारा दिला की कंपनीने समस्येचे निराकरण केले नाही तर ते ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करतील.
शिवाय या घटनेनंतर ग्राहकांनी फ्लिपकार्टविरोधात तक्रार केली असून याप्रकरणी ग्राहक मंचाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून इतर ग्राहकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये, अशी ग्राहकांची इच्छा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फ्लिपकार्टवर कारवाई करण्यासंदर्भात पोस्टचा पूर आला आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या डिस्काऊंटच्या अटींमध्ये, स्टॉक संपेपर्यंत किंवा ऑफरची मुदत संपेपर्यंत ऑफर वैध असेल असे स्पष्ट केले होते. परंतु ग्राहकांचं म्हणण आहे की त्यांनी ऑफरच्या अटी पूर्ण केल्या आहेत, तरी देखील त्यांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या.