Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

BGMI WhatsApp Login: बीजीएमआय प्लेअर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. या नवीन फीचरमुळे प्लेअर्सना पासवर्ड किंवा पारंपरिक लॉगिनशिवाय फक्त व्हॉट्सअ‍ॅच्या मदतीने अकाउंट ऍक्सेस करणे शक्य होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 01:44 PM
BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

Follow Us
Close
Follow Us:
  • BGMI मध्ये आता लॉगिन विथ व्हॉट्सअ‍ॅप हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप चॅटद्वारे लॉगिन लिंक मिळते आणि त्यातून अकाउंट थेट उघडता येते.
  • हे फीचर अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
तुम्ही देखील बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (बीजीएमआय) प्लेअर आहात का? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बीजीएमआय प्लेअर्सना आता लॉगिन करण्यासाठी एक नवीन पर्याय मिळणार आहे. आता गेमर्स मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देखील लॉगिन करू शकणार आहेत. याबाबत काही रिपोर्ट्स देखील समोर आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, आता बीजीएमआय प्लेअर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लॉगिन करण्यासाठी एक नवीन पर्याय मिळणार आहे. हे फीचर आता गेममध्ये लाईव्ह झाले आहे.आता कंपनी प्लेअर्सना उपलब्ध असलेल्या फेसबूक ऑप्शनसह आणखी पर्याय देणार आहे. आता यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देखील लॉगिन करू शकणार आहेत. बीजीएमआयच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर याबाबत घोषणा करण्यात आली आहे. अँड्रॉईडसह आयफोन यूजर्स देखील या नवीन फीचरचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

कसं काम करणार बीजीएमआय व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन फीचर?

बीजीएमआयमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लॉगिन करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे आणि चॅट्स बेस्ड आहे. म्हणजेच आता गेममध्ये लॉगिन करताना तुम्हाला क्रेडेंशियल्सचा वापर करण्याची गरज नाही. याऐवजी आता ऑथेंटिकेशनसाठी गेमर्सना व्हॉट्सअ‍ॅप कन्वर्सेशनवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. ज्या गेमर्सना मोबाईलद्वारे ऑथेंटिकेट करायचे आहे किंवा ज्यांना सोशल मीडिया लॉगिनला पर्याय हवा आहे, अशा प्लेअर्ससाठी हे फीचर सुरु करण्यात आले आहे. केवळ लॉगिनच नाही तर नव्या फीचरच्या मदतीने रिकवरी देखील अगदी सहज केली जाणार आहे. यासाठी यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट त्यांच्या मोबाईल नंबरसह लिंक असणं गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बीजीएमआय व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन फीचर वापरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

बीजीएमआय व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी बीजीएमआय ओपन करा. इथे तुम्हाला लॉगिन विथ व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडोजवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. इथे तुम्हाला प्री-फील्ड मेसेज दिसेल. हा मेसेज सेंड करा. तुम्ही या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर लॉगिन प्रोसेस सुरु होणार आहे. यानंतर चॅटमध्ये तुम्हाला एक लॉगिन लिंक दिसेल. या लिंकवर टॅप केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये बीजीएमआय ओपन होईल आणि तुम्ही तुमचे अकाऊंट एक्सेस करू शकाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पासवर्डची गरज भासत नाही.

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

बीजीएमआयमध्ये आले हे नवीन अपडेट्स

बीजीएमआयमध्ये सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सचा समावेश केला जात आहे. अलीकडेच कंपनीने 4.3 अपडेट देखील रिलीज केले होते. ज्यामध्ये थीम्ड मोड आणि मॅपमधील सुधारणांसारखे नवीन गेमप्ले एलिमेंट्स जोडण्यात आले होते. यानंतर आता कंपनी आणखी एक अपडेट घेऊन आली आहे. ज्यामध्ये प्लेअर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लॉगिन करण्याची सुविधा मिळणार आहे.

Web Title: Good news for bgmi players no need of password for login whatsapp will help you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर
1

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल
2

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…
3

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज
4

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.