(फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
Google ने भारतात AI Gemini अॅप लाँच केले आहे. हे अॅप ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज आम्ही भारतात Google चे AI Gemini लाँच करत आहोत. हे अॅप भारतातील इंग्रजी, मराठीसह ९ भाषांमध्ये उपलब्ध आहे. AI Gemini भारतात लाँच करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’
भारतातील Google वापरकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून AI Gemini ॲपच्या प्रतिक्षेत होते. अखेर आता AI Gemini ॲप भारतात लाँच झाल्यामुळे Google वापरकर्त्यांची प्रतिक्षा संपली आहे. Google ने AI Gemini ॲप पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि तुर्कीमध्ये लाँच केले आहे. AI Gemini अॅपच्या मदतीने वापरकर्ते कमीत कमी वेळात जास्त माहिती शोधू शकतात. Google च्या AI Gemini ॲपद्वारे वापरकर्ते बोलून, टाईप करून किंवा अॅपवर चित्र शेअर करून संबंधित माहिती शोधू शकतात. AI Gemini च्या मदतीने तुम्ही अलार्म, टाइमर आणि रिमाइंडर देखील सेट करू शकता. Google चे AI Gemini ॲप वापरकर्त्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. Android आणि IOS वापरकर्ते Google च्या AI Gemini ॲपचा वापर करू शकतात.
वापरकर्त्यांना Google Play वर जाऊन AI Gemini ॲप डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड झाल्यानंतर हे अॅप तुमच्या फोनमध्ये दिसू लागेल. त्यानंतर तुम्हाला Google Assistant ला AI Gemini ॲपवर स्विच करावे लागेल. AI Gemini ॲपमध्ये Google Assistant चे सर्व फीचर अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही फीचरसाठी तुम्हाला Google Assistant चा वापर करावा लागणार आहे. AI Gemini अॅप काही विशिष्ट फीचरसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्ते फाईल अपलोड करणे, AI Gemini अॅपसोबत इंग्रजीमध्ये संवाद साधणे आणि डेटा विश्लेषणाची सुविधा आहे.






