Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor X5d ने वेधले सर्वांचे लक्ष! बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव, डिझाईन पाहून टेकप्रेमी उत्सुक

Honor ने नुकत्याच लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ चिपसेट आणि 5,260mAh बॅटरी दिली आहे. तसेच Honor X5d सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 10:18 AM
Honor X5d ने वेधले सर्वांचे लक्ष! बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव, डिझाईन पाहून टेकप्रेमी उत्सुक

Honor X5d ने वेधले सर्वांचे लक्ष! बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव, डिझाईन पाहून टेकप्रेमी उत्सुक

Follow Us
Close
Follow Us:
  • Honor X5d आणि X5d Plus हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट किंमतीत लाँच झाले असून 9,000 ते 11,000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.
  • दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.74-इंच डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो G81 प्रोसेसर आणि 5260mAh बॅटरीसह चांगली परफॉर्मन्स मिळते.
  • X5d Plus मध्ये 50MP कॅमेरा तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये 13MP कॅमेरा देण्यात आला असून Android 15 आधारित MagicOS 9.0 सपोर्ट आहे.
चीनमधील स्मार्टफोन कंपनी Honor ने मलेशियामध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये Honor X5d Plus आणि Honor X5d यांचा समावेश आहे. कंपनीने त्यांचे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स बजेट किंमतीत लाँच केले आहेत. डिझाईन, डाइमेंशन आणि कलर ऑप्शनच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स सारखेच दिसतात. Honor X5d सीरीज कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. बजेट किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच कंपनीचे हे लेटेस्ट डिव्हाईस पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज आहेत.

AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Honor X5d सीरीजची किंमत आणि उपलब्धता

Honor X5d सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्स एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. Honor X5d Plus स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत MYR 459 म्हणजेच सुमारे 11,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर स्टँडर्ड मॉडेलच्या Honor X5d 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत MYR 369 म्हणजेच सुमारे 9,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून ग्राहक हे दोन्ही डिव्हाईस खरेदी करू शकतात. Honor X5d Plus आणि Honor X5d मिडनाइट ब्लॅक आणि टाइडल ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य –Honor)

Honor X5d सीरीजचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने लाँच केलेले दोन्ही लेटेस्ट डिव्हाईस अँड्रॉईड 15-बेस्ड मॅजिकओएस 9.0 ने सुसज्ज आहेत. या हँडसेटमध्ये 6.74-इंच TFT LCD टचस्क्रीन देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये आय कंफर्ट आणि डायनॅमिक डिम्मिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G81 चिपसेट दिला आहे. तसेच Honor X5d सीरीजमधील हँडसेटमध्ये एआरएम माली जी52 एमसी2 जीपीयू आणि 4GB रॅम दिला आहे. तर Honor X5d मध्ये 64GB स्टोरेज आणि Plus मॉडेलमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.

Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Honor X5d फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. ज्यामध्ये 0.08-मेगापिक्सेलचा QVGA कॅमेरा दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. Honor X5d Plus मध्ये 50MP प्रायमरी रियर कॅमेरा सपोर्ट मिळणार आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 15W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,260mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Honor x5d smartphone series launched in malaysia users will get premium experience in budget price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?
1

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत
2

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण
3

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

देशी कंपनीचा धमाका! 12 हजारांहून कमी किंमतीत नवा Lava फोन लाँच… तगडी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज
4

देशी कंपनीचा धमाका! 12 हजारांहून कमी किंमतीत नवा Lava फोन लाँच… तगडी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.