Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

Honor X7e Plus 5G Launched: टेक कंपनी ऑनरने बजेट सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्ले यांसारखे आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 11:46 AM
अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज... किंमत खिशाला परवडणारी

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज... किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • ऑनरने 8100mAh बॅटरी आणि AI बटणासह ऑनर एक्स 7 ई प्लस 5G स्मार्टफोन लाँच केला.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.
  • ऑनर एक्स 7 ई प्लस 5G ची सुरुवातीची किंमत सुमारे 23,500 रुपये ठेवण्यात आली आहे.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी ऑनरने आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor X7e Plus 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने सध्या त्यांचा नवीन स्मार्टफोन कतार आणि ओमान या दोन देशांमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोन बजेट प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपयांहून कमी आहे. स्मार्टफोनचे डिझाईन अतिशय आकर्षक आणि कूल आहे. त्यामुळे हा नवीन स्मार्टफोन म्हणजेच स्टायलिश लूक, कमी किंमत आणि पावरफुल फीचर्स यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

ऑनर एक्स 7 ई प्लस ची किंमत आणि उपलब्धता

ऑनरने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या व्हेरिअंटची किंमत QAR 999 म्हणजेच सुमारे 23,500 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत QAR 1,099 म्हणजेच सुमारे 25,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डेझर्ट गोल्ड, वेल्वेट ब्लॅक आणि मेटिअर सिल्व्हर या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: Honor) 

ऑनर एक्स 7 ई प्लस 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.87 इंच टीएफटी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एचडी+ रेजोल्यूशन, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1020 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनमध्ये डायनॅमिक डिमिंग आणि आय कंफर्ट सारखे काही मोड्स देखील देण्यात आले आहेत.

AI बटण

विशेष म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये एक डेडिकेटेड AI बटण देखील पाहायला मिळणार आहे. या बटणच्या मदतीने तुम्ही एआय मेमरी, सर्कल टू सर्च, एआय इरेजर, एआय सारांश आणि स्मार्ट शिफारसी सारखे फीचर्स क्विक एक्सेस करू शकता.

प्रोसेसर

दमदार परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 6GB/128GB आणि 8GB/256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकता. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 बेस्ड मॅजिकओएस 10 आहे. या डिव्हाईसमध्ये रॅम टर्बो फीचर देखील दिले आहे, जे स्टोरेजचा काही भाग व्हर्च्युअल रॅम म्हणून वापरते.

बॅटरी

ऑनर एक्स 7 ई प्लस 5G मध्ये 8100mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W सुपरचार्ज फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन -30°C ते 50°C पर्यंत तापमानात देखील काम करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, दीर्घकाळ वापरानंतरही बॅटरी तिची 80 टक्क्यांहून अधिक क्षमता टिकवून ठेवू शकते.

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

कॅमेरा

फोटोग्राफी लवर्ससाठी नव्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचाा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यासोबत एक सेकेंडरी सेंसर देखील दिले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचाा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स, एनएफसी, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, ब्लूटूथ 5.1 यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये IP68, IP69 आणि IP69K रेटिंग दिली आहे.

Web Title: Honor x7e plus 5g launched with ai button and many other powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
1

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये
2

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत
3

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत

Facebook Down: देशभरात फेसबुक ठप्प! लाखो युजर्सना लॉगइन करण्यात अडचण; काय आहे यामागील कारण?
4

Facebook Down: देशभरात फेसबुक ठप्प! लाखो युजर्सना लॉगइन करण्यात अडचण; काय आहे यामागील कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.