Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये
जर तुमचा कंम्युटर आधीच्या तुलनेत खराब परफॉर्मंस ऑफर करत असेल किंवा अचानक तुमची सिस्टिम खराब परफॉर्मंस ऑफर करू लागली, तर समजा की तुमच्या सीपीयूमध्ये गडबड आहे. यामागे दुसरी हार्डवेअर कारणं देखील असू शकतात. यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सीपीयूमध्ये काही समस्या असेल तर टेक्नीशियनकडून तपासून घेणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
यासोबतच, जर तुमचा सीपीयू गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर तुमच्या सिस्टिममध्ये काही गडबड असण्याची शक्यता असू शकते. जर तुमच्या सिस्टिमचा फॅन खूप जोरात आवाज करत असेल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप गरजेपक्षा जास्त गरम होत असेल किंवा तापमान खूप जास्त असेल तर सीपीयूवर जास्त दबाव येऊ शकतो किंवा कूलिंग सिस्टिम खराब होऊ शकते. दिर्घकाळ ओव्हरहिटींगमुळे सीपीयूला नुकसान पोहोचू शकते.
जर तुमच्या कंप्यूटरचे पावर बटन प्रेस केल्यानंतर देखील सिस्टिम योग्य प्रकारे सुरु होत नसेल, वारंवार बूट लूपमध्ये अडकत असेल किंवा BIOS मध्ये प्रवेश करता येत नसेल तर ही समस्या सीपीयू किंवा मदरबोर्डसंबंधित असू शकण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत हार्डवेअर चाचणी घ्या ज्यामुळे तुम्हाला योग्य कारण समजू शकेल.
सहसा पाहू शकता की काम करताना कंप्यूटर वारंवार फ्रीज होऊ शकतो किंवा अचानक रिस्टार्ट होऊ शकतो किंवा ब्लू स्क्रीन सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल, तर हे सीपीयूच्या समस्येचे लक्षणे असू शकते. रॅम किंवा स्टोरेजच्या समस्यांमुळे देखील सीपीयू खराब होऊ शकते. तुम्हाला वारंवार ही लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, सीपीयू वेळीच तपासून घ्या.
इतकंच नाही, जर कंप्यूटर सॉफ्टवेयर वारंवार बंद होत असेल, फाईल्स करप्ट होत असतील किंवा सिस्टिममध्ये वारंवार एरर दिसू लागल्या तर याचा अर्थ असा आहे की, सीपीयू योग्य प्रकारे काम करत नाही. अशा परिस्थितीत, प्रोफेशनल डायग्नोस्टिक टेस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे.






