Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
जास्त प्रमाणात गीझर ब्लास्ट होण्याच्या घटना कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नाही तर निष्काळजीपणामुळे घडतात. सेफ्टी वाल्व जाम होणं, थर्मोस्टॅट योग्य प्रकारे काम नं करणं किंवा वेळोवेळी सर्विस न करणं या सर्व कारणांमुळे गिझरचा ब्लास्ट होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जेव्हा गीझरध्ये पाण्याचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढते आणि पाण्याला बाहेर जाण्याचा रस्ता उपलब्ध नसेल तर टँक ब्लास्ट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक घरांमध्ये गीझर बाथरुममधील अशा ठिकाणी लावला जातो, जिथून हवा खेळती राहणं अत्यंत कठीण असतं. बंद आणि ओलसर जागांमध्ये गीझरचा वापर केल्यास गरमी आतमध्ये जमा होते. विशेषत: गॅस गीझरच्या बाबतीत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. योग्य वेंटिलेशन झाले नाही तर विषारी गॅस जमा होऊन ब्लास्ट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे तुमचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो.
हिवाळ्यात लोकं अंघोळ करण्यापूर्वी गिझर जास्त वेळ चालू ठेवतात. तुम्हाला देखील अशी सवय असेल तर ती वेळेत बदला अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. तुमची ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त वेळ गीझक चालू ठेवल्यास प्रेशर आणि तापमान दोन्ही वाढते. अनेक वेळा लोक आंघोळ केल्यानंतरही गीझर बंद करायला विसरतात, जे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.
Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक
काही योग्य सवयी आणि सावध राहून तुम्ही गिझरचा योग्य वापर करू शकता. वेळोवेळी गीझरची सर्विस करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे सेफ्टी वाल्व आणि थर्मोस्टैट योग्य स्थितीत राहतात. अंघोळीला जाण्यापूर्वी गिझर चालू करा आणि तुमचं काम झाल्यानंतर गीझर आठवणीने बंद करा. तुमच्या बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन ठेवा आणि जुन्या किंवा सदोष गीझरकडे दुर्लक्ष करू नका. काही सावधगिरी बाळगल्याने या हिवाळ्यातील “टाइमबॉम्ब” पासून स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण होऊ शकते.






