नवी दिल्ली : एचपीने (HP) नुकताच संपूर्णपणे नव्या ऑल-इन-वन (All In One) म्हणजेच सर्व वैशिष्ट्ये एकातच मिळतील अशा पीसीजची (PC) नवी श्रेणी सादर केली. यात पीसी आणि टीव्हीच्या क्षमता (Capabilities of PC and TV) असल्याने हायब्रिड (Hybrid) पद्धतीने काम करणाऱ्यांना काम आणि मनोरंजन असे सर्वच अनुभव अगदी सहज घेता येतील.
या नव्या ऑल-इन-वन पीसीमध्ये एचपी एन्व्ही (HP Envy) ३४ इंची आणि पॅव्हेलियन (Hp Pavilion) ३१.५ इंची पीसीचा समावेश आहे. काम, नवनिर्मिती आणि मनोरंजन अशा मल्टिटास्किंगसाठी दमदार ताकद आणि परफॉर्मन्स मिळावा यासाठी या पीसीमध्ये इंटेल ११ वी आवृत्ती आणि १२ वी आवृत्ती प्रोसेसर्स आहेत. यातील टीव्ही क्षमतांमुळे आधुनिक क्रिएटर्सना कंटेंट स्ट्रिमिंगमधून अगदी सहज गेमिंगकडे वळता येते किंवा हायब्रिड कार्यपद्धतीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी पर्यायी स्क्रीन म्हणून एआयओचा वापर करता येतो.
एचपी एन्व्ही ३४ इंची ऑल-इन-वन म्हणजे तुमच्यातील सर्जनशील अभिव्यक्तीसाठी एक सुयोग्य व्यासपीठ आहे. या डिव्हाइसमध्ये अँटी ग्लेअर डिस्प्ले आहे. ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक सुयोग्य, प्रवाही माध्यम उपलब्ध होते. या पीसीच्या अभिजात स्टाइलला बुद्धिमान, हलवता येण्याजोग्या कॅमेऱ्याची जोड लाभली आहे. या कॅमेऱ्यामुळे उत्तम फोटोसाठी विविध प्रकारच्या पोझिशन्स बदलता येतात.
[read_also content=”महिला डॉक्टरवर जडला निरागस बालकाचा जीव; ४० लाख लोकं पडले व्हिडिओच्या प्रेमात https://www.navarashtra.com/viral/viral-video-kid-was-checking-by-lady-doctor-and-he-gave-lovely-expression-see-the-details-in-marathi-nrvb-316455/”]
एचपी पॅव्हेलियन ३१.५ इंची ऑल-इन-वन पीसीची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ज्यामुळे कामाचे वातावरण आणि सहजसोप्या पद्धतीने मनोरंजनाचा अनुभव अशा दोन्ही गोष्टींमध्ये सहज वावरता येते. एकाच, फारशी जागा न व्यापणाऱ्या डिव्हाइसमध्ये काम, सर्जनशीलता आणि मनोरंजन अशी अनेक उद्दिष्टे लाभत असल्याने हायब्रिड जीवनशैलीसाठी ही एक उत्तम निवड ठरते. शाश्वत परिणाम साधण्याचे एचपीचे उद्दिष्ट जपत एचपी पॅव्हेलियन ३१.५ इंची ऑल-इन-वनची रचना शाश्वत पद्धतीने करण्यात आली आहे. यात समुद्रात फेकण्यात आलेले प्लास्टिक आणि ग्राहकांनी वापरून टाकून दिलेल्या पुनर्वापरयोग्य प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे.
एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “ग्राहकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नाविन्यपूर्ण उत्पादने बनवण्यावर एचपी नेहमीच भर देते. आता आपली जीवनशैली हायब्रिड पद्धतीच्या दिशेने बदलत आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांच्या घरातील वातावरणाला अनुसरून त्यांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचे नवे ऑल-इन-वन डेस्कटॉप्स आजच्या युगातील आधुनिक क्रिएटर्सच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांना काम, मनोरंजन आणि सर्जनशील कामांसाठी वेगवेगळे डिव्हाइस न वापरता या सगळ्यासाठीच साह्य करतात.”
TUV प्रमाणित डिस्प्ले, आरामदायी कमी ब्लू लाइटसाठी प्रमाण कमी जास्त करता येईल अशा ब्लू लाइट रिडक्शन फिल्टरसह
• 5K डिस्प्ले, २१:९ अस्पेक्ट रेशिओ, त्यामुळे सर्जनशील प्रक्रियेत अधिक काम सामावले जाते
• काढून ठेवता येणारा, मॅग्नेटिक कॅमेरा, अधिक चांगला अँगल मिळावा यासाठी हा कॅमेरा विविध पोझिशन्समध्ये बदलता येतो
• व्हिडीओ चॅटसाठी आधुनिक कॅमेरा सेन्सर आणि एचपी एन्हान्स्ड लायटिंग
• विविध प्रकाशयोजनेतही उत्कृष्ट दृश्यात्मक अनुभव आणि आरामदायी स्थितीसाठी अँटी-रिफ्लेक्शन ग्लास
• अल्ट्रा थिन (अत्यंत पातळ), सुंदर, परिणामकारक डिझाइनसह फारशा दिसणारही नाहीत अशा ३ बाजूंच्या मायक्रो एज बेझल कडा असलेला डिस्प्ले
• ११ जेन ८ कोअर इंटेल कोअर i9 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 3060 ची ताकद, त्यामुळे सृजनात्मक गरजा सहज पूर्ण करण्याची ताकद मिळते
• बिनिंग तंत्रज्ञान आणि अधिक मोठ्या सेन्सरसह 16MP कॅमेऱ्यामुळे अधिक उत्तम काँण्ट्रास्ट आणि रिझोल्युशन मिळतं
• कल्पक आणि सर्जनशील कामगिरीसाठी एचपी क्विक ड्रॉप, ॲमेझॉन ॲलेक्सा व्हॉईस असिस्टंट, एचपी एन्हान्स्ड लायटिंग
• तळाशीच असलेल्या वायरलेस चार्जिंग सुविधेसह मिळवा उच्च प्रतीचा सोयीस्कर अनुभव
• यातील ३१.५ इंची यूएचडी डिस्प्लेसह HDR 400, DCI-P3 98% आणि QHD/sRGB 99% मिळतो
• एचपी आयसेफ प्रमाणित, फ्लिकर-मुक्त टीयूव्ही प्रमाणित, अँटी-ग्लेअर पॅनल
डिझाइन
• एनर्जी स्टार प्रमाणित आणि EPEAT सिल्व्हर नोंदणीकृत
• स्लीक, जागा कमी वापरणारे डिझाइन, वायरलेस माऊस, किबोर्ड आणि चार्जिंगमुळे वायरींचा गुंता टाळता येतो
• १२ जेन इंटेल i5 आणि i7 प्रोसेसर्स
• विविध एचडीएमआय पोर्ट्समुळे सर्व मनोरंजनाच्या गरजा एकत्रच पूर्ण होतात आणि Audio by B&O मुळे श्राव्यनुभवही अधिक आकर्षक बनतो
• युनिव्हर्सल रिमोट स्विच या रिमोटवर फक्त एक क्लिक करा आणि कामाला मौजमजेत बदला
किंमत आणि उपलब्धता
• एचपी एन्व्ही ३४ इंची ऑल-इन-वन डेस्कटॉप पीसी टर्बो सिल्व्हर अशा मोहक रंगात १,७५,९९९ रु. या किमतीला खरेदीसाठी उपलब्ध आहे
• एचपी पॅव्हेलियन ३१.५ इंची ऑल-इन-वन डेस्कटॉप पीसी सुंदर, चमकदार काळ्या रंगात ९९,९९९ रु. या किमतीला खरेदीसाठी उपलब्ध आहे