Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Huawei Nova 16 and Nova 16z Launched: Huawei नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगसह पुन्हा एकदा टेक मार्केटमध्ये मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक खास आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 11:53 AM
Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री... किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री... किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • हुआवेई नोव्हा 16 आणि Nova 16z हे स्मार्टफोन्स 100W फास्ट चार्जिंग आणि मोठ्या बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत.
  • हुआवेई नोव्हा 16 मध्ये 7,000mAh बॅटरी, Kirin 9010S चिपसेट आणि 50MP पेरिस्कोप कॅमेरा मिळतो.
  • हुवावे नोव्हा 16z मध्ये 6,000mAh बॅटरी, OLED डिस्प्ले आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Huawei Nova Smartphone Launched: टेक कंपनी Huawei ने त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Huawei Nova 16 अखेर लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजमध्ये Huawei Nova 16, Nova 16z, Nova 16 Pro आणि Nova 16 Ultra हे डिव्हाईस लाँच केले आहेत. यातील हुआवेई नोव्हा 16 आणि हुवावे नोव्हा 16z या दोन स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आता जाणून घेऊया. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स मिडरेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत.

IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर… itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये

हुआवेई नोव्हा 16 आणि हुवावे नोव्हा 16z ची किंमत

हुआवेई नोव्हा 16 स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 42,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 49,000 रुपये ठेवली आहे. तसेच हुवावे नोव्हा 16z हा CNY 2,699 म्हणजेच सुमारे 38,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – X) 

हुआवेई नोव्हा 16 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

हुआवेई नोव्हा 16 स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.68-इंच फुल एचडी+ (1,280 x 2,800 पिक्सेल) ओएलईडी डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा लेटेस्ट लाँच फोन कंपनीच्या इनहाउस Kirin 9010S चिपसेट आणि 12GB रॅमने सुसज्ज आहे. कॅमेरा डिटेल्सबद्दल बोलायचं झालं तर, हुआवेई नोव्हा 16 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे.

फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सेंसर दिला आहे. हुआवेई नोव्हा 16 मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 6, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, बेईडू, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि नेव्हिकला सपोर्ट देण्यात आला आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

हुवावे नोव्हा 16z चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

हुवावे नोव्हा 16z मध्ये 6.7-इंच का फुल एचडी+ (1,084×2,412 पिक्सेल) ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये हुआवेई नोव्हा 16 सारखाच फ्रंट आणि रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हुवावे नोव्हा 16z च्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये सेकेंडरी कॅमेरा 12-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस आहे. हुवावे नोव्हा 16z मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टससह 6,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमधील इतर फीचर्स नोवा 16 सारखेच आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Huawei कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Huawei ही चीनची बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे.

  • Que: Huawei चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Huawei स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा, प्रीमियम डिझाइन आणि दमदार हार्डवेअरसाठी ओळखले जातात.

  • Que: Huawei फोनमध्ये गूगल अ‍ॅप्स मिळतात का?

    Ans: नवीन Huawei स्मार्टफोनमध्ये गुगल मोबाईल सर्व्हिसेस (जीएमएस) उपलब्ध नसू शकतात. त्याऐवजी कंपनीचे स्वतःचे एचएमएस (हुआवेई मोबाईल सर्व्हिसेस) दिले जाते.

Web Title: Huawei nova 16 and nova 16z launched read features price and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Huawei
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.