बिल्ट-इन GPS आणि ECG सेंसरसह Huawei स्मार्टवॉच भारतात लाँच, वाचा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Huawei Watch Fit 4 सीरीज मे महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली होती. आता कंपनीने या सिरीजमधील दोन डिव्हाईस म्हणजेच Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro भारतात लाँच केले आहे. भारतात लाँच करण्यात आलेल्या स्मार्टवॉचमध्ये ग्लोबल मॉडल्ससारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये फंक्शनल बटन्स आणि 1.82-इंच AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हे वॉच इन-बिल्ट GPS सपोर्ट करते आणि सिंगल चार्जवर 10 दिवसांची बॅटरी लाईफ देते, असा दावा कंपनीने केला आहे.
Flipkart लिस्टिंगनुसार, बेस Huawei Watch Fit 4 ची किंमत भारतात 12,999 रुपये आणि Huawei Watch Fit 4 Pro ची किंमत भारतात 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रो व्हेरिअंटचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स ग्लोबल मॉडलसारखीच आहे. मात्र हे डिव्हाईस फ्लिपकार्टवर Huawei Watch Fit 4 नावाने लिस्ट करण्यात आले आहे. Huawei Watch Fit 4 ब्लॅक, ग्रे, पर्पल आणि व्हाइट स्ट्रॅप कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, तर Pro मॉडेल ब्लू, ब्लॅक (फ्लूरोइलास्टोमर) आणि ग्रीन (नायलॉन) स्ट्रॅप व्हेरिअंट्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Huawei)
Huawei Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro दोन्हीमध्ये 1.82-इंच रेक्टेगुलर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 480 x 408 पिक्सेल्स आहे. हे वॉच अनुक्रमे 2,000 निट्स आणि 3,000 निट्स ब्राइटनेस लेवल्सला सपोर्ट करतात. केस अॅल्युमिनियम मिश्र धातुपासून बनलेला आहे, प्रो ऑप्शनमध्ये टायटॅनियम मिश्र धातुचा बेझल आहे. प्रत्येक घड्याळाला रोटेटिंग क्राउन आणि साइड बटन असते.
Huawei Watch Fit 4 सीरीज 5ATM वॉटर रेजिस्टेंस रेटिंग ऑफर करतो. प्रो व्हेरिअंट्समध्ये एक्स्ट्रा IP6X डस्ट रेजिस्टेंस रेटिंग आहे. लाइनअपमध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकर्स जसे हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2) आणि स्लीप मॉनिटर्स आहे. Pro मॉडलमध्ये ECG सेंसर देखील आहे. Huawei च्या Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro मध्ये Huawei चे Sunflower Positioning System आहे.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाला, AI टूलवर…
रेगुलर GPS ट्रॅकिंगसह, हे वॉटर स्पोर्ट्स रूट ट्रॅकिंग देखील ऑफर करते. हे ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते आणि यूजर्सना घड्याळावरून थेट जोडलेल्या डिव्हाइसचे संगीत प्लेबॅक आणि कॅमेरा शटर व्यवस्थापित करण्याची परवानगी देतात. ते iOS आणि Android दोन्ही डिव्हाइसेसशी सुसंगत आहेत. Huawei नुसार, Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी वापरात 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकतात. सामान्य वापराच्या परिस्थितीत ते 7 दिवसांपर्यंत टिकतात. ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) सक्षम असताना बॅटरी लाइफ 4 दिवसांपर्यंत असल्याचे म्हटले जाते.