अमित ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचे अनावरण
नवी मुंबईः नेरूळ सेक्टर १ डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय समोरील शिवरायांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. महाराजांची मूर्ती ठेवून ती कापडात गुंडाळण्यात आली आहे. निवडणुकांत अनेक लोकोपयोगी कामांचे श्रेय मिळविण्यासाठी त्याचे उद्घाटन आपल्या हातून व्हावे यासाठी शिवरायांची मूर्ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अडकली आहे. ‘शिवराय अडकले उद्घाटनाच्या श्रेयवादात’ अशा आशयाचे वृत्त दै. ‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तास शिवप्रेमींनी भरभरून दाद देत पालिकेकडून होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
अखेर रविवारी मनसेच्या शाखांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईत आलेल्या अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसैनिकांनी गुंडाळून ठेवलेली महाराजांची मूर्ती मुक्त करत, त्यास जलाभिषेक घालत, हळद कुंकवाने पूजा करत, हर घालून फुले वाहत या मूर्तीचे अनावरण केले. पोलिसांनी मनसैनिकांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरला. यानंतर शिवरायांच्या मुद्द्यावरून नवी मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवराय अडकले उद्घाटनाच्या श्रेयात
नेरूळ सेक्टर १ राजीव गांधी उड्डाणपूलसमोर आलेल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे संबोधण्यात येते. मात्र या चौकात छत्रपतींची मूर्ती मात्र उभारली गेलेली नाही. ही बाब लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते देवा म्हात्रेनी सातत्याने पालिका ते जिल्हाधिकारी असा पाठपुरावा करत या ठिकाणी छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे शिवप्रेमींचे स्वप्न पूर्ण केले. मात्र पालिकेकडून या कामास सातत्याने विलंब केला जात होता. सहज होणारी कामे हत्तीच्या गतीने सुरू ठेवत काम रखडवल्याचा आरोप पालिकेवर होत होता.
शिवरायांचे स्मारक होते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत…
विधानसभा निवडणुकांच्या आधी हे काम पूर्ण होऊन शिवरायांच्या स्मारकाचे थाटामाटात उद्घाटन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र कामास विलंब झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. मात्र आता पालिका निवडणुकांचा कालावधी आहे. अशात शहरातील लोकार्पण सत्ताधारी पक्षातील नेते करत असतात. त्यानुसार शहरातील इतर् वास्तूंसोबत शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन देखील यात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मनसेचा गनिमी कावा, सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले
सत्ताधारी व पालिका प्रशासनाकडून होणारा विलंब आणि शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे पाहून अखेर मनसे नेते अमित ठाकरेंनी या पुतळ्याचे अनावरण करून एकप्रकारे गनिमी कावा करत सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळल्याचे या अनावरणाने दिसून आले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह मनसैननिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
Navi Mumbai: शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची होणार स्थापना; नेरूळमध्ये अवतरली शिवशाही
या पुतळ्याचे उद्घाटन कोणीही केले तरी हरकत नाही. मात्र अमित ठाकरेंनी ही बाब नागरिकांना सांगणे आवश्यक होते. किमान ते थाटामाटात केले असते, आम्ही शिवोमी म्हणून सामील होऊ शकलो असतो. सर्वच शिप्रेमींची ती इच्छा होती. अद्याप सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे मेघडंबरीला रंग लावणे बाकी आहे. मी अमित ठाकरे यांना याच विषयावरून जाब विचारला – देवा म्हात्रे, शिवरायांच्या मूर्तीसाठी पाठपुरावा करणारे, सामाजिक कार्यकर्ते, नेरूळ नेरूळ येथील शिवसृष्टी अनेक महिन्यांपासून तयार आहे. पण महाराजांचा पुतळा धुळीने माखलेल्या कपड्याने बंदिस्त होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीची ही एक प्रकारे विटंबना होती. शेकडो शिवप्रेमीनी शिवसृष्टी सर्वसामान्यांसाठी खुली केली, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी वेळ नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यामुळे माझ्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही. महाराजांसाठी अशा अनेक केसेस घेण्याची तयारी आहे. – अमित ठाकरे, मनसे नेते याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते, वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. जर आम्ही अनावरण करणार हे जाहीर केले असते तर, इथे १०० ते २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असता. त्यामुळे गनिमी काव्याने हे काम आम्ही फत्ते केले, राजकीय नेत्यांच्या श्रेयवादात शिवरायांना अडकवणे योग्य नाही. याबावत पोलिसांनी पालिकेला जनभावना लक्षात घेऊन या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तरीही पालिकेकडून विलंब केला जात आहे – गजानन काळे, मनसे शहराध्यक्ष, नवी मुंबई






