फोटो सौजन्य - pinterest
भारत डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली डिजीटल इंडिया प्रोजेक्ट लाँच केला होता. या प्रोजेक्टअंतर्गत भारताला डिजीटल बनवण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या. यातीलच एक योजना म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करणं. डिजीटल इंडिया प्रोजेक्ट लाँच झाल्यानंतर शासानाने देशातील खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. डिजीटल इंडिया प्रोजेक्टनंतर आता भारतातील सुमारे 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यामुळे मोबाईल युजर्सची संख्या देखील प्रचंड वाढली आहे.
हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत सध्या देशातील 95 टक्के गावांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. याबाबत शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने माहिती दिली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2024 पर्यंत भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या 95.44 कोटी आहे. यापैकी 39.83 कोटी युजर्स भारताच्या खेड्यापाड्यांमधील आहेत. एप्रिल 2024 पर्यंत 6,44,131 गावांपैकी 6,12,952 गावांमध्ये 3G/4G मोबाईल इंटरनेट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत, सरकारने मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरे तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
हेदेखील वाचा- बजेट किंमतीत Samsung Galaxy F14 5G भारतात लाँच! जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
मोबाईल आणि इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल युजर्सची संख्या 25.15 कोटींवरून 95.44 कोटी झाली आहे. यापैकी 39.83 कोटी युजर्स भारताच्या खेड्यापाड्यांमधील आहेत. वार्षिक आधारावर 14.26 टक्के CAGR ची वाढ झाली आहे. इंटरनेटची उपलब्धता वाढत असल्याने मोबाईल युजर्सची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. डिजीटल इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सध्या देशातील 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.
डिजीटल इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत गेल्या 10 वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आला असल्याचं सरकारने म्हटलं आहे. यामध्ये टियर 2 आणि टियर 3 शहरे तसेच देशाच्या अंतर्गत भागांचा समावेश आहे. ग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने ‘भारतनेट’ प्रकल्प सुरू केला होता. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे हा सराकारने सुरु केलेल्या भारतनेट प्रकल्पाचा उद्देश होता. सरकारने सांगितलं की, 2.2 लाख ग्रामपंचायतींपैकी 2.13 लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये, सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसवण्याच्या नियमात बदल केला होता, जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देता येईल.