Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य

Pakistan Drone Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या संघर्षाचा फायदा सोशल मीडियावरील काही फेक पेजनी घेतला आहे. सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेज आणि दावे सध्याच्या या परिस्थितीत व्हायरल होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2025 | 11:05 AM
India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य

India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सुरु असलेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या वाढत्या तणावादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Instagram आणि Facebook वर अनेक दावे केले जात आहेत. सोशल मीडियावरील काही दावे इतके व्हायरल झाले आहेत, की लोकं या दाव्यांना खरे मानत आहेत. अशाच एका व्हायरल झालेल्या दाव्याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं धक्कादायक उत्तर! म्हणाला, युद्ध झालं तर…

स्मार्टफोनची लोकेशन सेवा बंद ठेवा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला जात आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या या संघर्षादरम्यान तुमच्या स्मार्टफोनची लोकेशन सेवा बंद ठेवा. या लोकेशन सर्विसमुळे पाकिस्तान सर्वाधिक लोकं असलेल्या क्षेत्रांना टार्गेट करत आहे. हा दावा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र आता हा दावा खोटा असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित एक पोस्ट देखील शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

PIB Fact Check ने काय सांगितलं?

PIB Fact Check ने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. पीआयबीने म्हटलं आहे की, सरकारद्वारे फोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याची कोणतीही अ‍ॅडवाइजरी जारी करण्यात आली नाही. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेऊ नका.

A viral image is claiming that an advisory has been issued, advising people to turn off location services on their phones immediately.#PIBFactCheck

– This claim is FAKE

– No such advisory has been issued by the GoI pic.twitter.com/8GmYpKXTkJ

— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केला जात आहे?

PIB Fact Check ने व्हायरल मेसेजचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, यामध्ये असं सांगितलं आहे की, अधिकृत ईमेलवर एक महत्त्वाचा सल्ला शेअर करण्यात आला आहे. मेलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तुमच्या स्मार्टफोनची लोकेशन सर्विस ताबडतोब बंद करा. ईमेलमध्ये असे सांगण्यात आले आहे की फोनच्या लोकेशन सर्विसवरून सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र ओळखण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. या ठिकाणी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद करा.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पुन्हा नवं षडयंत्र! Cyber War ची केली जातेय तयारी, भारतीय सैनिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

PIB Fact Check ने म्हटलं आहे की, भारत सरकरकडून अशा प्रकारची कोणतीही अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली नाही. हा पाकिस्तानकडून केला जाणार प्रचार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने लोकांना पाकिस्तानकडून शेअर केल्या जाणाऱ्या फेक न्यूजबाबत अलर्ट दिला होता. सरकारने लोकांना यापूर्वी देखील सांगितलं होतं की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. सरकारने आता पुन्हा भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे, की सोशल मीडियावरील फेक मेसेजपासून दूर राहा.

In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.

It’s crucial to scrutinize every piece of information carefully.

If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,… pic.twitter.com/YomXZUKmpH

— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025

फेक पोस्टची अशा प्रकारे करा रिपोर्ट

तुम्हाला सोशल मीडियावर एखादी फेक पोस्ट किंवा संशयास्पद कंटेट पाहायला मिळाला, जो भारतीय सशस्त्र दलाशी संबंधित आहे किंवा सध्याच्या भारत आणि पाकिस्तानच्या हल्ल्यांशी संबंधित असेल तर त्याबाबत त्वरीत रिपोर्ट करा. तुम्ही #PIBFactCheck वर हा रिपोर्ट करू शकता.

Web Title: India pakistan war turn off mobile location during pakistan drone attack post is viral on social media know the truth tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Entertainment News
  • india pakistan war
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
1

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
3

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
4

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.