Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल! तब्बल 2.5 करोड IRCTC अकाउंट्स केले डिलीट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Indian Railway IRCTC App: रेल्वेने तात्काळ तिकीट बुकींग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्हावी, यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार OTP आधारित लॉगिन वेरिफिकेशन अनिवार्य झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2025 | 10:18 AM
भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल! तब्बल 2.5 करोड IRCTC अकाउंट्स केले डिलीट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल! तब्बल 2.5 करोड IRCTC अकाउंट्स केले डिलीट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टूरिज्म कारपोरेशन म्हणजेच IRCTC भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. तिकीट बुक करणं, रेल्वेचे अपडेट्स इत्यादीसाठी IRCTC अ‍ॅप प्रवाशांसाठी फायद्याचे ठरते. 2002 च्या सुरुवातीला हे अ‍ॅप भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी लाँच केले होते. तिकीट बुकिंग करण्यासाठी, रेल्वेचे अपडेट्स मिळवण्यासाठी, जेवण ऑर्डर करण्यासाठी, टूरिज्म सर्विसेजसाठी हे अ‍ॅप प्रवाशांसाठी अतिशय फायद्याचे आहे.

Tech Tips: तुमच्या मृत्यूनंतर Gmail अकाउंटचं काय होतं? वैयक्तिक माहिती कशी ठेवाल Safe? जाणून घ्या सोप्या Tricks

डिजिटल सफाई अभियानाअंतर्गत घेतला निर्णय

भारतीय रेल्वेने एजेंट्सची सुरु असलेली मनमानी थांबवण्यासाठी आणि अ‍ॅपवरील फेक अकाऊंट्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. अ‍ॅपवरील फेक अकाऊंट्सवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तिकीट बुकिंगमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत आणि व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 2.5 करोड फेक IRCTC यूजर अकाउंट्स आता बंद करण्यात आले आहेत. डिजिटल सफाई अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

2.5 करोड अकाउंट्स बंद का केले?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, ज्या अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे, ते सर्व अकाऊंट्स बनावट ओळखीद्वारे बनवण्यात आले होते, या अकाऊंट्सचा उपयोग एजेंट्स आणि दलाल तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी करत होते. रेल्वेच्या डेटा एनालिसिस टीमने सांगितलं आहे की, या अकाउंट्सची ओळख पटवण्यात आली असून त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. सामान्य प्रवाशांना योग्य संधी देणे आणि ब्लॅक मार्केटिंग आणि मध्यस्थांना आळा घालणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.

1 जुलैपासून लागू करण्यात आले नवे तात्काळ नियम

IRCTC अकाऊंट आधार लिंकिंग करणं अनिवार्य झाले आहे. आता फक्त आधार-व्हेरिफाईड युजर्सच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. यामुळे बनावट ओळखपत्रांसह तिकीट बुकिंग थांबेल आणि फक्त खऱ्या प्रवाशांनाच प्राधान्य मिळेल. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आता एकूण रेल्वे तिकिटांपैकी 89 टक्के तिकिटे आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे ऑनलाइन बुक केले जात आहेत.

IRCTC वर लॉगिन करण्यात अडचण येतेय

IRCTC वरून तिकीट बुक करणं अधिक सोपं झालं आहे. याशिवाय बदलत्या नियमांमुळे सामान्य युजर्सना अधिक प्राधान्य दिलं जात आहे. अनेकदा IRCTC युजर्सना लॉगिन करण्यात अडचण येते किंवा अनेकदा असंही घडतं की युजर्स पासवर्ड विसरतात. तुम्हाला देखील IRCTC वर लॉगिन करण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही देखील तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर काही सोप्या पद्धतीने पासवर्ड रिसेट करू शकता.

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

  • सर्वात आधी ब्राऊझरवरून आईआरसीटीसी वेबसाईटवर जा.
  • समोर दिसत असलेल्या पेजवर, वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन-ओळींच्या मेनूवर टॅप करा आणि ‘लॉगिन’ पर्यायावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला ‘Forgot account details’ हा ऑप्शन दिसेल.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला IRCTC यूजरनेम किंवा रजिस्टर्ड ईमेल आईडी शेअर करावा लागणार आहे.
  • आता कॅप्चा एंटर करा आणि खाली दिलेल्या ‘नेक्स्ट’ बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किवा ईमेल आईडीवर OTP येईल.
  • आता तुम्हाला OTP आणि नवीन पासवर्ड आणि दुसरा कॅप्चा टाकावा लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, खाली दिलेल्या बॉक्समधील ‘पासवर्ड अपडेट करा’ बटणावर क्लिक करा.
  • ही संपूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर, तुमचा पासवर्ड रीसेट होईल.

Web Title: Indian railway deleted 25 crore irctc accounts railway minister ashwini vaishnav shared this information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • IRCTC
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.