Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

Instagram Edit Feature: इंस्टाग्राम पोस्टवर चुकीची कंमेंट शेअर केली? थांबा, डिलीट करू नका... कारण आता कमेंट डिलीट न करता देखील तुम्हाला नवीन कमेंट करता येणार आहे. कसं? इंस्टाग्राम एक नवीन फीचर घेऊन आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 01:51 PM
Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

Follow Us
Follow Us:
  • Instagram वर आता यूजर्सना कमेंट पोस्ट केल्यानंतर 15 मिनिटांत ती एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे.
  • या फीचरमुळे चुकीची कमेंट डिलीट करण्याऐवजी थेट दुरुस्त करता येणार आहे, जे खासकरून क्रिएटर्ससाठी फायदेशीर आहे.
  • हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट झाले असून, कमेंट एडिट केल्यावर ‘Edited’ असा टॅग दिसणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या करोडो यूजर्ससाठी एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. इंस्टाग्रामने एक नवीन फीचर सादर केलं आहे. या नव्या फीचरअंतर्गत आता यूजर्सना त्यांच्या कमेंट्स एडिट करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. यासाठी टाईम लिमीट देखील सेट करण्यात आली आहे. म्हणजेच यूजर्स एका मर्यादित काळापर्यंत या फीचरचा वापर करू शकणार आहेत. बऱ्याच काळापासून कंपनी या फीचरची चाचणी करत होती. यापूर्वी हे फीचर बीटा वर्जनमध्ये उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केलं आहे. मेटाने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. आता ज्या यूजर्सकडे मेटा वेरिफाइड सब्सक्रिप्शन आहे आणि ज्या यूजर्सकडे सब्सक्रिप्शन नाही, असे सर्व यूजर्स इंस्टाग्रामच्या नव्या फीचरचा वापर करू शकणार आहेत.

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स… TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

कोणाला मिळणार नव्या फीचरचा फायदा?

इंस्टाग्रामने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या किंवा दुसऱ्या एखाद्या इंस्टाग्राम यूजरच्या पोस्टवर कमेंट करताना काही चूका करता. यामुळे संपूर्ण कमेंट डिलीट करावी लागते आणि पुन्हा टाईप करावी लागते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता इंस्टाग्राम त्यांच्या यूजर्ससाठी एक खास फीचर घेऊन आले आहे. या नवीन फीचरअंतर्गत आता यूजर्स त्यांनी शेअर केलेल्या कमेंट्स एडीट करू शकणार आहेत. त्यामुळे जरी काही चुकले असेल तरी संपूर्ण कमेंट डिलीट करण्याची गरज भासणार नाही. हे विशेषत: अशा कंटेट क्रिएटर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, जे त्यांच्या फॉलोवर्सच्या कमेंट्सना रिप्लाय करतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

इतकी असेल वेळ मर्यादा

मेटाच्या मालकीच्या सोशल मीडियी प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, कमेंट केल्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीसाठी यूजर्सना एडीटचा पर्याय मिळणार आहे. 15 मिनिटे संपल्यानंतर यूजर्सना एडीट पर्याय मिळणार नाही. तसेच फोटोसह करण्यात आलेल्या कमेंटमध्ये यूजर्स केवळ टेक्स्ट एडिट करू शकणार आहेत. यूजर्स त्यांच्या कमेंट्स शेअर केल्यापासून 15 मिनिटांच्या आत हव्या तितक्या वेळा एडिट करू शकणार आहेत.

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

कोणत्या यूजर्सना मिळणार नवं फीचर?

इंस्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कमेंट्स एडीट करणार, तिथे यूजर्सना एडीटेड लिहीलेले दिसणार आहे. जसे फेसबूक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसतं. मात्र यूजर्सना हिस्ट्री दिसणार नाही की, पहिल्यांदा काय कमेंट शेअर करण्यात आली होती. इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. सर्व यूजर्सना लवकरच हा पर्याय दिसणार आहे. जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये हे फीचर नसेल, तर गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ॲप अपडेट करा. ॲप अपडेट झाल्यावर, यूजर्सना हे फीचर मिळू लागेल.

Web Title: Instagram introduces new edit feature users can edit comments know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक
1

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?
2

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण
3

युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण

Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर
4

Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.