Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या
ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजमधून एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर हटवण्यात आले आहे. खरं तर 2023 मध्ये कंपनीने इंस्टाग्राममध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर जोडले होते. मेटाने व्हॉट्सअॅप प्रमाणेच इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरसाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर आणले होते. मात्र आता कंपनीने हे फीचर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर हटवल्यानंतर आता यूजर्स इंस्टाग्रामवर कोणत्या व्यक्तीसोबत बोलत आहेत, याचा संपूर्ण एक्सेस मेटाकडे असणार आहे. म्हणजेच आता यूजर्सच्या चॅट्सवरील प्रायव्हसी हटवली जाणार आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरमुळे इंस्टाग्रामवरील मेसेज केवळ सेंडर आणि रिसीवरपर्यंत असतात. हे मेसेज मेटाद्वारे देखील एक्सेस केले जाऊ शकत नव्हते. मात्र आता असं होणार नाही. कारण कंपनी आता महत्त्वाचे फीचर हटवणार आहे.
मेटाने त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, इंस्टाग्राममध्ये केल्या जाणाऱ्या या बदलामुळे जर यूजर्सना त्यांच्या जुन्या चॅट्स सुरक्षित आणि प्रायव्हेट ठेवायच्या असतील तर दिलेल्या सूचनांच्या मदतीने तुम्ही तुमचे वैयक्तिक मीडिया आणि चॅट्स डाउनलोड करू शकता. पर्सनल चॅट्स डाऊनलोड करण्यासाठी यूजर्सना त्यांचे इंस्टाग्राम अॅप लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करावे लागणार आहे. मेटाने घेतलेल्या या निर्णयानंतर आता यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंस्टाग्रामनंतर फेसबुक मेसेंजर देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढून टाकेल का? सध्या कंपनीकडून या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी बाल शोषण प्रकरणी मेटाच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिका आणि यूकेमधील अनेक सरकारी एजेसिंनी बाल शोषणाप्रकरणी व्हायरल झालेला कंटेंट डिटेक्ट करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन हटवण्याची मागणी केली होती. व्हॉट्सअॅप प्रमाणे, इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरमध्ये देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील संभाषणे पूर्णपणे खाजगी राहतात आणि MeMe किंवा इतर कोणत्याही एजन्सीद्वारे ती अॅक्सेस करता येत नाहीत. मात्र आता इंस्टाग्रामवरील हे फीचर हटवल्यानंतर यूजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार, यात काही शंकाच नाही.






