Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

IRCTC New Website: आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट 15 जुलै रोजी लाँच होणार असल्याची अपेक्षा होती, मात्र आता तिचे लाँच पुढे ढकलण्यात आले आहे. नव्या वेबसाईटमध्ये अनेक आधुनिक फीचर्स मिळणार असले तरी प्रवाशांना तिच्यासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 03:23 PM
IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • 15 जुलै रोजी लाँच होणारी IRCTC ची नवीन वेबसाईट आता पुढे ढकलण्यात आली असून ती ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
  • नवीन वेबसाईटमध्ये वेगवान तिकीट बुकिंग, मल्टीलिंगुअल सपोर्ट, सुधारित सीट निवड आणि अधिक यूजर-फ्रेंडली इंटरफेस मिळणार आहे.
  • सणासुदीच्या काळातील तिकीट बुकिंगचा ताण कमी करण्यासाठी आणि दिव्यांग, रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगली सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अशी अपडेट समोर आली होती की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन आयआरसीटीसी वेबसाईट लाँच केली जाणार होती. आज 15 जुलै रोजी ही नवीन वेबसाईट लाँच केली जाणार होती. त्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांना नव्या वेबसाईटची प्रतिक्षा होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, नवीन वेबसाईट आज 15 जुलै रोजी लाँच केली जाणार नाही. या वेबसाईटच्या लाँचिंगसाठी थोडा वेळ लागू शकतो. यामुळे आता प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. आयआरसीटीसीची ही नवीन वेबसाईट कधी लाँच होणार आणि नव्या वेबसाईटसाठी प्रवाशांना किती वाट पाहावी लागणार, याबाबत आता जाणून घेऊया.

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

कधी लाँच होणार नवीन वेबसाईट?

खरं तर सुमारे एका महिन्यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका ईव्हेंटमध्ये भाष्य करताना म्हटलं होतं की, 15 जुलै रोजी आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट लाँच केली जाणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर नव्या वेबसाईटबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता रेल्वेच्या सूत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट आज लाँच केली जाणार नाही. ही वेबसाईट लाँच करण्यासाठी अद्याप काही काळ लागू शकतो. प्रवशांना आणखी 4 ते 5 आठवडे वाट पाहावी लागू शकते.

आयआरसीटीसीची नवीन अपडेटेड वेबसाईट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या वेबसाईटच्या लाँचिंगबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत, आता प्रवाशांना पुन्हा एकदा नव्या वेबसाईटसाठी वाट पाहावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

Realme चा नवा स्मार्टफोन! Realme P4R 5g; प्रत्येक खिशाला परवडणारा… एकूण बॅटरी पॉवर : 8000 mAh!

नवीन वेबसाईट लाँच का झाली नाही?

आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट अनेक नवीन फीचर्स आणि अपडेटसह लाँच केली जाणार आहे. नवीन वेबसाईट सुरु झाल्यानंतर तिकीट बुकींगची प्रोसेस आणखी सोपी होणार आहे आणि आताच्या तुलनेत अधिक वेगवान देखील होणार आहे. इतकंच नाही तर नवीन वेबसाईट जास्त यूजर फ्रेंडली आहे. ज्यामुळे वेबसाईट वापरताना हँग होणार नाही. याव्यतिरिक्त नव्या वेबसाईटमध्ये मल्टीलिंगुअल सपोर्ट, चांगली सीट निवडण्याचा पर्याय, भाडे वेळापत्रक आणि दिव्यांग व्यक्ती, रुग्ण आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगली एक्सेसिबिलिटी मिळणार आहे. इतकंच नाही तर गर्दीच्या हंगामात किंवा सणासुदीच्या काळात तिकीट बुक करताना होणारा त्रासही दूर होईल.

Web Title: Irctc new website launch delayed check new expected launch date and upcoming features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • IRCTC
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण
1

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
2

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
3

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
4

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.