प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री... दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही
EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?
कंपनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 6GB + 256GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट असलेल्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक फ्लॅश ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांत हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Realme)
तसेच कंपनी लाँच ऑफरअंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिस्काऊंट देखील ऑफर करणार आहे. ग्राहकांना रियलमी नार्झो 100x 5G च्या सर्व व्हेरिअंटवर 2 हजार रुपयांचे डिस्काऊंट आणि 500 रुपयांचे कूपन मिळणार आहे. यानंतर 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,499 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,499 रुपये होणार आहे. फोनची विक्री 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर देखील सुरु होणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.81 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 720×1570 पिक्सेल आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. नव्या फोनमध्ये 4GB/6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 64GB/128GB/256GB यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनचे रॅम 14GB पर्यंत वर्चुअली वाढवले जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित Realme UI 7.0 ने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा, यासाठी फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
हा स्मार्टफोन 8000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जवर हा फोन 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर करतो.
Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम
सिक्योरिटीसाठी नव्या रियलमी नार्झो 100x 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकग्निशन सपोर्ट दिला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, 5G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, ईयरफोन जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस दिले आहे.






