Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio चे ग्राहकांना खास सरप्राईज! 10व्या वर्धापनदिनानिमित्त उघडला ऑफर्सचा खजिना; आता एकाच प्लॅनमध्ये डेटा, ओटीटी आणि AIचा धमाका

Jio Anniversary Offer: जिओने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना डेटासोबत ओटीटीचीही मेजवानी मिळणार आहे. 3,599 च्या वार्षिक प्लॅनसोबत ग्राहकांना अतिरिक्त 120GB 5G डेटा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 12:02 PM
Jio चे ग्राहकांना खास सरप्राईज! 10व्या वर्धापनदिनानिमित्त उघडला ऑफर्सचा खजिना; आता एकाच प्लॅनमध्ये डेटा, ओटीटी आणि AIचा धमाका

Jio चे ग्राहकांना खास सरप्राईज! 10व्या वर्धापनदिनानिमित्त उघडला ऑफर्सचा खजिना; आता एकाच प्लॅनमध्ये डेटा, ओटीटी आणि AIचा धमाका

Follow Us
Follow Us:
  • जिओची मेगा ॲनिवर्सरी ऑफर; ₹3,599 च्या वार्षिक प्लॅनसोबत ग्राहकांना अतिरिक्त 120GB 5G डेटा मिळणार आहे.
  • डेटासोबत ओटीटीचीही मेजवानी; जिओहॉटस्टार मोबाईल+ हॉलिवूड सब्सक्रिप्शन आणि 50GB फ्री क्लाउड स्टोरेजचा लाभ मिळणार आहे.
  • एआय चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट; प्लॅनसोबत 18 महिन्यांचं गुगल एआय प्रो सब्सक्रिप्शन आणि 5TB क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.
Jio 10th Anniversary Offer: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलाअंस जिओने 10 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास मेगा ॲनिवर्सरी ऑफर सादर केली आहे. कंपनीने त्यांच्या सर्वात लोकप्रिय 3,599 रुपयांच्या वार्षित प्रीपेड प्लॅनमध्ये आणखी काही फायदे जोडण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सादर केलेल्या या ऑफरअंतर्गत आता यूजर्सना एक्स्ट्रा 5G डेटापासून जिओहॉटस्टार आणि गूगल एआय प्रो सारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत.

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

10 वर्षांपूर्वी झाली होती सुरुवात

कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये रिलाअंस जिओची घोषणा करत टेलीकॉम सर्विसमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. आता त्यांनी यशस्वीरित्या 10 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. सुरुवातीच्या काळात कंपनीने फ्री सिमपासून फ्री डेटा ऑफरपर्यंत अत्यंत आकर्षित पद्धतीने यूजर्सची संख्या वाढवली. त्यामुळे अवघ्या कमी काळातच कंपनीने टेलिकॉम मार्केट हादरवून टाकलं. जिओने अत्यंत कमी काळात करोडो यूजर्सचा टप्पा पार केला आणि आज ही देशातील सर्वात मोठ्या टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्सपैकी एक आहे. कंपनीने 10 वर्षांचा हा प्रवास पूर्ण करत त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

FREE BENEFITS WORTH ₹35,100 🎉 FREE pro plan of Google Gemini for 18-months (worth ₹35,100) for Jio users aged 18–25 years (early access) using an eligible Unlimited 5G plan. Enjoy unlimited chats, 2TB cloud storage, video generation on Veo 3.1, image generation with Nano… pic.twitter.com/O5Pqpo2K4r — Reliance Jio (@reliancejio) October 30, 2025

काय आहे जिओची ॲनिवर्सरी ऑफर?

जिओ सध्या त्यांच्या 3,599 रुपयांच्या प्लॅनवर खास ॲनिवर्सरी ऑफर देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2.5GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात यूजर्सना एकूण 912.5GB डेटा दिला जाणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. इतकंच नाही तक जिओ खास ऑफरअंतर्गत यूजर्सना या प्लॅनसोबत एक्स्ट्रा 120GB 5G डेटा देखील देणार आहे. यामुळे हा प्लॅन आणखी खास होणार आहे. हा डेटा 10GB च्या मंथली बूस्टर स्वरुपात मिळणार आहे आणि ग्राहक प्लॅनच्या संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान हा डेटा एकूण 12 वेळा रिडीम करू शकणार आहेत.

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

ओटीटी आणि एआय फायदे देखील मिळणार

प्लॅनमध्ये केवळ डेटा फायदेच मिळणार नाहीत तर हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळणार आहे. यूजर्सना जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडचा ॲक्सेस देखील मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना जिओ स्पेशल ऑफर अंतर्गत जिओहॉटस्टारचे मोबाइल+हॉलीवुड सब्सक्रिप्शन आणि 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये यूजर्सना 18 महिन्यांचे गूगल एआय प्रो सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत सुमारे 35,100 रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. यामध्ये 5TB क्लाउड स्टोरेजसह नॅनो बनाना सारख्या एआय फीचर्सचा ॲक्सेस देखील मिळणार आहे.

Web Title: Jio 10th anniversary offer 3599 rupees annual plan gets extra 5g data jiohotstar and google ai pro benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास
1

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक
2

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स
3

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही
4

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.