Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास
हे नवीन ईअरफोन्स भारतात कधी लाँच होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ऑडिओ ब्रँडने कंफर्म केलंं आहे की, नॉईज मास्टर बड्स ओपन या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच केले जाणार आहेत. या ऑडिओ डिव्हाईसची एंट्री रिटेल स्टोअर्स, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि नॉईजच्या अधिकृत वेबसाईटद्वारे केली जाणार आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या नव्या ईअरफोन्सच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती जाहिर केली नाही. (फोटो सौजन्य: X)
नॉईज मास्टर बड्स ओपनमध्ये एक ओपन-ईयर फॉर्म फॅक्टर आहे, जो यूजर्सना कान पूर्णपणे बंद न करता ऑडिओ ऐकू देतो. हे एक प्रीमियम प्रोडक्ट असणार आहे. हे ईअरफोन्स विशेषत: अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहेत, ज्यांना गाणी ऐकताना किंवा फोनवर बोलताना आजूबाजूच्या वातावरणाविषयी जागरुक राहायला आवडतं.
ऑडिओ ब्रँडने ईव्हेंटमध्ये नॉईज मास्टर बड्स ओपनचे डिझाईन देखील सादर केले आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ब्रॉन्ज आणि गोल्ड कलर ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. कंपनीने अद्याप कलर ऑप्शन्सच्या अचूक शेड्सची माहिती दिली नाही. या इअरबड्सची रचना दांडीसारखी असून, कानाजवळ गोलाकार ‘अकौस्टिक’ भाग आणि वरच्या बाजूला मेटॅलिक टेक्सचर आहे. ईयरबड्सच्या बाहेरील बाजूला नॉईज ब्रँडिंग आणि ‘साऊंड बाय बोस’ लोगो पाहायला मिळत आहे.
OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स
नॉईजच्या मास्टर बड्स सिरीजमध्ये आधीपासूनच मास्टर बड्स आणि मास्टर बड्स 2 मॉडेल्स समाविष्ट आहेत. हे दोन्ही मॉडेल्स ‘साऊंड बाय बोस’ टेक्नोलॉजी ऑफर करते. मास्टर बड्स 2 ईयरफोन्स यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात 7,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. यामध्ये IPX5-रेटेड बिल्ड आणि स्पैटियल ऑडियो सपोर्ट दिला आहे. यामध्ये डुअल कनेक्टिविटी आणि हेड जेस्चर कंट्रोल्स आहे. हे ‘नॉइज ऑडिओ’ ॲपशी सुसंगत आहेत. हे 51dB पर्यंतच्या एएनसीला सपोर्ट करतात आणि यात सहा-माईकची ईएनसी प्रणाली देण्यात आली आहे.






