भारतातील सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन! ब्रिटिश काळात आले बांधण्यात, स्वातंत्र्यानंतरही पूर्वीसारखेच...
आजच्या काळात, विशेषतः कोविड 19 नंतर, लॅपटॉपचा वापर खूप वाढला आहे. अनेक ऑफिसेस वर्क फ्रॉम होम मोडवर काम करत आहेत आणि बहुतांश शाळा-कॉलेजची कामेही आता ऑनलाइन झाली आहेत. अशा स्थितीत कामाच्या मध्येच अचानक लॅपटॉप हँग झाल्यामुळे कामात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी अनेक जण करत आहेत. या समस्येमुळे आपली बरीच कामे रखडतात किंवा उशिरा होतात आणि यात आपला वेळही वाया जातो.
ही समस्या सहसा जुन्या लॅपटॉपमध्ये अधिकतर उद्भवताना दिसून येते. मात्र आता या समस्येमुळे तुम्हाला तुमचा लॅपटॉप बदलावा लागणार नाही, कारण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा लॅपटॉप हँग होण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करावा लागेल.
टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया स्मार्टफोनवर आढळून येतात, अशाप्रकारे करा साफ
हे आहे बेस्ट सोल्युशन
जेव्हा कोणत्याही डिव्हाइसची मेमरी भरू लागते, तेव्हा तो अचानक हळू किंवा हँग होऊ लागतो. जेव्हा तुम्ही लॅपटॉपमधून डेटा डिलीट करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या लॅपटॉपची मेमरी रिकामी झाली आहे. पण तुम्ही विसरलात की हा सर्व डिलीट केलेला डेटा लॅपटॉपच्या रिसायकल बिनमध्ये जातो. त्यामुळे लॅपटॉप हँग होणे टाळायचे असेल तर प्रथम तुमचा रीसायकल बिन स्वच्छ ठेवा.
चुकूनही हे काम करू नका
लॅपटॉपवर काम करत असताना, अनेक वेळा असे घडते की तुम्ही एकाच वेळी लॅपटॉपवर अनेक विंडो ओपन करता जेणेकरून तुम्हाला शक्य तितके काम एकाच वेळी पूर्ण करता येईल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे लॅपटॉपवरील अनेक विंडो म्हणजेच प्रोग्राम्स उघडल्याने लॅपटॉप स्लो होऊ शकतो किंवा जास्त लोडमुळे तो हँग होऊ शकतो.
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा करा वापर
आपण अँटीव्हायरस वापरणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा जेव्हा व्हायरस तुमच्या लॅपटॉपमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते तुमच्या लॅपटॉपची स्पीड कमी करतात. त्यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये अँटी व्हायरस डाऊनलोड केलेला नसेल तर लगेच डाउनलोड करा. हे सॉफ्टवेअर वेळोवेळी तपासत राहील की तुमच्या लॅपटॉपवर व्हायरसचा हल्ला झाला आहे का? याच्या मदतीने तुम्ही तुमचा लॅपटॉप सुरक्षितही ठेवू शकाल.