Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Lenovo Legion Y70 2026 Launched: गेमर्ससाठी टेक कंपनी Lenovo ने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 36,895 रुपये आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसमध्ये 8000mAh बॅटरी आणि 2K गेमिंग डिस्प्लेसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 11:16 AM
Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच... किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच... किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Lenovo Legion Y70 (2026) मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंच 2K अमोलेड एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळतो.
  • गेमिंग स्मार्टफोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी आणि 50MP सोनी कॅमेरा देण्यात आला आहे.
Lenovo Smartphone Launched: टेक कंपनी लेनेव्हाने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या लाँच ईव्हेंटदरम्यान आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Lenovo Legion Y70 (2026) या नावाने सादर केला आहे. कंपनीने लाँच केलेले हे लेटेस्ट डिव्हाईस एक गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये अपडेटेड डिस्प्ले टेक्नोलॉजी, ऑल न्यू प्रोसेसर आणि मोठी बॅटरी दिली आहे. नवा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन… ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

Lenovo Legion Y70 (2026) ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरु करण्यात आली आहे. या डिव्हाईसची विक्री 9 जूनपासून सुरु होणार आहे. कंपनीने 4 स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्यामध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB यांचा समावेश आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2599 युआन म्हणजेच सुमारे 36,895 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3199 युआन म्हणजेच सुमारे 45,410 रुपये आहे. 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3599 युआन म्हणजेच सुमारे 51,090 रुपये आहे. 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 4399 युआन म्हणजेच सुमारे 62,455 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Lenovo Legion Y70 (2026) चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.82-इंच 2K अमोलेड एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 7000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10+, डीसी डिमींग, डॉल्बी विजनने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये अ‍ॅड्रेनो 829 जीपीयूसह ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 3nm प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईस 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा 9600Mbps रॅमसह 256GB/512GB/1TB यूएफएस 4.1 स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 1/1.56″ सोनी LYT-710 सेंसर, f/1.88 अपर्चर, ओआयएससह 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये f/2.2 अपर्चर आणि मॅक्रो ऑप्शनसह 8MP ऑटोफोकस अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Lenovo launched new gaming smartphone lenovo legion y70 2026 read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
1

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
2

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
3

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
4

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.