फोटो सौजन्य सोशल मिडिया
Maruti Suzuki : आता देशात वाहन बाजारात फँक्टरी मध्ये तयार करण्यात येणाऱ्या बाजारात पहिल्यांदाच सामान्य माणसांना परवडेल अशा कमी किमती मध्ये मारुती सुझुकिने नविन कार बाजारात आणल्या आला. मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशातील वाहन बाजारात पहिल्यांदाच आपल्या फॅक्टरी-फिटेड S-CNG कार बरोबर ऑटोमॅटिक (AMT) गियरबॉक्सची सांगड असलेली कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना सीएनजीच्या किफायतशीर इंधना बरोबर ऑटोमॅटिक कार चालवण्याचा अनुभवही घेता येणार आहे.
मारुती सुझुकीच्या सुरुवातीच्या लोकप्रिय मॅाडेल्स पैकी तिन नव्या गाड्या बाजारात उपल्बध होणार आहे. या तिन्ही गाड्यांमध्ये १.२ लिटर ची सुविधा ३ सिलेंडर Z सिरीज पेट्रोरल इंजिन आणि ५ स्पीड ऑटोमॅटीक मॅन्युअल ट्रन्सफरमेशन गियर बॅाक्स देण्यात आला आहे.
टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
या तिन्ही गाड्यांमध्ये मारुती स्विफ्ट (Swift CNG AMT)ची किंम ७.९२ लाख एवढी असू ती ३५.३४ किमी मायलेज देते
मारुती बलेनो (Baleno CNG AMT) ८.३२ लाख ३४.४७ किमी , मारुती डिझायर (Dzire CNG AMT) ८.५३ लाख ३६.४७ किमी मायलेज देते.
मारुती सुझुकिच्या या नव्या कारच्या फीचर्स आणि वैशिष्टये बद्दल म्हटलं तर ही कार क्लच-फ्री ड्रायव्हिंग असून कार चालकाला ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबण्याचा त्रास होणार नाही. मारुती सुझुकिच्या या कारला सर्वात जास्त मायलेज: आणि विशेष म्हणजे, मॅन्युअल (Manual)व्हर्जनपेक्षा या गाड्यांचे AMT व्हर्जन थोडे जास्त मायलेज देते असे कंपनीने म्हटले आहे. मारुती सुझुकिच्याया कार मध्ये ६ एअरबॅग्ज, ईएसपी (ESP) आणि हिल होल्ड असिस्ट सारखे आधुनिक सुरक्षा फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. या मध्ये सीएनजी आणि एएमटी एकत्र येण्याचे जास्त फायदे आहेत. मारुतीच्या सीनजी कारच्या जबरदस्त मायलेजसाठी ओळखल्या जातात. एएमटी तंत्रज्ञानामुळे या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही. तर ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलण्याची आणि क्लच दाबण्याची गरज पडणार नाही. नेहमीच्या ऑटोमॅटिक (CVT किंवा Torque Converter) कारच्या तुलनेत एएमटी कारची किंमत आणि त्यांचा मेंटेनन्स खूप कमी असतो . भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्सनंतर आणि सीएनजी ऑटोमॅटिक कार लाँच करणारा मारुती सुझुकी हा दुसरा मोठा ब्रँड बनला आहे. शहरांमधील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे या नव्या गाड्यांना ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे .






