Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पर्धकांच टेंशन वाढलं! Motorola ने धडाधड लाँच केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, परवडणारी किंमत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज

Moto G37 Power and Moto G37 Launched: मोटोरोलाने पुन्हा एकदा स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने एकाचवेळी अनेक बजेट आणि फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच करत स्पर्धकांना टक्कर दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 12:06 PM
स्पर्धकांच टेंशन वाढलं! Motorola ने धडाधड लाँच केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, परवडणारी किंमत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज

स्पर्धकांच टेंशन वाढलं! Motorola ने धडाधड लाँच केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, परवडणारी किंमत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Motorola ने Moto G37 आणि G37 Power हे दोन नवे बजेट स्मार्टफोन्स लाँच केले.
  • Moto G37 मध्ये 50MP कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि 5200mAh बॅटरी मिळते.
  • कंपनीने याचबरोबर Razr 2026 सीरीजसह अनेक फोल्डेबल फोन लाँच करत मार्केटमध्ये स्पर्धा आणखी वाढवली आहे.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोला धडाधड स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीने मोटो जी 47, मोटो जी 87 आणि आता त्यांनंतर मोटो जी 37, मोटो जी 37 पावर असे 4 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने एकाचवेळी इतके स्मार्टफोन्स लाँच केल्याने स्पर्धकांना घाम फुटला आहे. याशिवाय कंपनीने मोटोरोला रेझर अल्ट्रा 2026, मोटोरोला रेझर+ 2026 आणि मोटोरोला रेझर 2026 हे तीन फोल्डेबल फोन्स देखील सादर केले आहेत. कंपनीने अचानक केलेल्या या धमाक्यामुळे आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

कंपनीने जागतिक बाजारात लाँच केलेल्या मोटो जी 37, मोटो जी 37 पावर बाबत आता जाणून घेऊया. हे स्मार्टफोन्स कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत आणि कलर व्हेरिअंट जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोटो जी 37, मोटो जी 37 पावर ची किंमत आणि उपलब्धता

मोटो जी 37 कंपनीने 4GB+ 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला असून त्याची सुरुवातीची किंमत 249 यूरो म्हणजेच सुमारे 27,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच मोटो जी 37 पावर 4GB + 256GB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 279 यूरो म्हणजेच सुमारे 31,000 रुपये ठेवली आहे. जर्मनीमध्ये कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. मोटो जी 37 स्मार्टफोन पँटोन फ्यूशिया रेड, पँटोन इंपेनेट्रेबल आणि पँटोन नॉटिकल ब्लू या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटो जी 37 पावर पँटोन कॅपरी, पँटोन इंपेनेट्रेबल आणि पँटोन नॉटिकल ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मोटो जी 37 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच एचडी+ एलसीडी पॅनल देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सँपलिंग रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1050 निट्सपर्यंत आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

कंपनीच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ग्राफिक्ससाठी माली-जी 57 जीपीयू दिला आहे. हा फोन 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. यासोबतच रॅम 12 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, मोटो जी 37 मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच सेकेंडरी सेंसर देखील इंटीग्रेट आहे, जे लाइट आणि फ्लिकर बॅलेंस करणार आहे. यामध्ये स्टीरियो स्पीकर सेटअप दिला आहे, जो डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि हाय-रेस ऑडिओला सपोर्ट करतो.

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

कनेक्टिविटी पर्याय

कनेक्टिविटीसाठी या हँडसेटमध्ये जीपीएस, ए-जीपीएस, ग्लोनास गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, बेईडू, 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ 5.4, डुअल बँड वायफाय, और ऑप्शन एनएफसीचा सपोर्ट दोखील दिला आहे. फोनमध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.

बॅटरी

मोटो जी 37 मध्ये 5,200mAh बॅटरी दिली आहे, जी 20W टर्बोपावर चार्जिंग आणि 6W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोलाचा फोन IP64 रेटिंग आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे.

मोटो जी 37 पावर चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोटो जी 37 पावर चे ऑपरेटिंग सिस्टम, रॅम, डिस्प्ले, रियर कॅमेरा, स्पीकर सेटअप, कनेक्टिविटी ऑप्शन आणि ड्यूरेबिलिटी रेटिंग मोटो जी 37 सारखीच आहे. हा फोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. फोन 256GB स्टोरेजसह लाँच केले आहे. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. फोनमध्ये 30W टर्बो पॉवर चार्जिंग आणि 6W वायर्ड रिवर्स चार्जिंगसह 7000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Motorola launched moto g37 power and moto g37 in budget segment read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!
1

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
2

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून
3

Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत
4

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.