किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा
मोटो जी 47 हा स्मार्टफोन 8GB + 128GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 319 यूरो म्हणजेच सुमारे 35,000 रुपये आहे. ग्राहकांना हे लेटेस्ट लाँच डिव्हाईस पँटोन फ्यूशिया रेड, पँटोन इंपेनेट्रेबल, पँटोन नॉटिकल ब्लू या रंगात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक कंपनी मोटोरोलाने लाँच केलेला हा स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह अँड्रॉईड 16 वर आधारित हॅलो यूआयसह सादर केला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंच एचडी+ (720 x 1,604 पिक्सेल) 8-बिट एलसीडी डिस्प्ले, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,050 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यासोबतच फोनमध्ये IP64 रेटिंग आणि एमआयएल-एसटीडी-810 एच सर्टिफिकेशन मिळणार आहे.
नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6nm ऑक्टा कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळणार आहे. हा फोन 8GB चे एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट देखील देण्यात आले आहे.
Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार
फोटोग्राफीसाठी मोटो जी 47 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे, ज्यासोबत 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-इन-1 लाइट सेंसर देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. मोटो जी 47 मध्ये 20W टर्बो पॉवर चार्जिंग आणि 6W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 5जी, 4जी एलटीई, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बेईडू, आणि QZSS कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.






