Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट Moto G87 ची किंमत 399 यूरो म्हणजेच सुमारे 45 हजार रुपये आहे. हा फोन येत्या काही आठवड्यांत EMEA आणि लॅटिन अमेरिका बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – Motorola)
मोटोरोलाने लाँच केलेल्या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K एक्सट्रिम अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे रिजॉल्यूशन स्टँडर्ड फुल एचडी पेक्षा 17 टक्के जास्त आहे. एवढंच नाही तर स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे प्रोटेक्शन दिले आहे.
मोटोरोला डिव्हाईसमध्ये 6nm मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये आर्म Mali-जी 57 एमसी 2 जीपीयू मिळणार आहे. मोटो जी 87 डिव्हाईस 4GB किंवा 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB किंवा 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज पर्यायांसह येते. रॅम बुस्ट फीचरच्या मदतीने तुम्ही फोनचे रॅम वर्चुअली 24GB पर्यंत वाढवू शकता.
रियर कॅमेरा सिस्टिममधील मोठ्या अपग्रेडसह कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि अल्ट्रा पिक्सेल टेक्नोलॉजीचा अनुभव देखील मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही टेक्नोलॉजी कमी प्रकाशात फोटो क्लिक करण्यासाठी लाइट सेंसिटिविटी 16 पट वाढवू शकते.
Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक
तसेच डिव्हाईसच्या मागील बाजूला f/2.2 अपर्चर वाला 8MP चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळणार आहे. हे डिव्हाईस 5200mAh बॅटरीने सुसज्ज असून त्यामध्ये 30W टर्बो पॉवर चार्जिंग सपोर्ट दिला आहे.






