MOBILE (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
Motorola Edge 60 Pro 5G चे भारतात लाँच होण्या आधी Motorola Edge 50 Pro 5 वर खूप चांगला डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही नवीन फ्लॅगशिप घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण उपस्थित असलेले फ्लैगशिपवर डीकॉउंट मिळत आहे. Edge 50 Pro 5G ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या किमतीत कपात करून लिस्ट करण्यात आले आहे. याच्या शिवाय बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरने अतिरिक्त बचतची संधी तुम्हाला मिळू शकते. चला जाणून घेऊयात Edge 50 Pro 5Gवर मिळणारे डील आणि ऑफरच्या बाबतीत.
Motorola Edge 50 Pro 5G चे वैशिष्ट्ये काय?
Motorola Edge 50 Pro मध्ये 6.7 इंचची 1.5K pOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. ज्याचा रेजोल्यूशन 2712 x 1220 पिक्सल, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 नीट्स पीक ब्राइटनेस आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 14वर बेस्ड Hello UI वर काम करतो. या फोने मध्ये धूळ आणि पाणी पासून वाचवण्यासाठी IP68 रेटिंग सुद्धा देण्यात आली आहे.
कॅमेरा सेटअपसाठी, Edge 50 Proच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 13 -मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. समोर ५० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे जी 125W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत काय?
Motorola Edge 50 Pro 5G चा 12+256GB व्हेरिएन्ट फ्लिपकार्टवर 27,999 रुपायनामध्ये लिस्ट करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी एप्रिल मध्ये 35,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. बँक ऑफरच्या बाबतीती जर बोलायला गेलं तर IDFC Bank क्रेडिट कार्ड ट्रॅनजेशनवर ५% डिस्काउंट (७५० रुपये पर्यंत) मिळू शकतो. त्यानंतर प्रभावी किंमत २७,२४९ रुपये होईल. हा फोन लाँच किंमतपेक्षा ८७५० रुपये स्वस्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये जुना किंवा उपस्तिथ असलेला फोन दिल्यावर १७,६३० रुपयांची बचत होऊ शकते.






