Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
भारतातून परदेशात प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पर्यटन मंत्रालयाच्या ‘इंडिया टूरिझम डेटा कॉम्पेंडियम २०२५’ (India Tourism Data Compendium 2025) नुसार, २०२४ मध्ये ३०.८९ दशलक्ष (३ कोटी ८ लाख ९० हजार) भारतीयांनी परदेश प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०.७९% वाढ झाली आहे. उद्योग क्षेत्रातील कल सूचित करतात की, भारतीयांना परदेशात सहकुटुंब प्रवास करणे अधिक आवडते. अलीकडच्याच एका उद्योग अहवालानुसार, सुमारे ५९% भारतीय त्यांच्या जोडीदारासोबत (पती/पत्नी) आणि २६% भारतीय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत प्रवास करतात.
आजच्या जागतिक कौटुंबिक प्रवाशांच्या गरजा ओळखून, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी VI घेऊन एक अभिनव योजना आली आहे. त्यांनी “फॅमिली आयआर” (Family IR) योजना सुरू केली आहे. टेलिकॉम उद्योगक्षेत्रात अशी सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय रोमिंग (IR) पॅकवर सूट देण्यात आली आहे. सध्याच्या प्रवासाच्या काळात आंतरराष्ट्रीय रोमिंग अधिक परवडणारे बनवण्याच्या उद्देशाने ही योजना खास डिझाइन करण्यात आली आहे. सध्या VI ही एकमेव ऑपरेटर कंपनी आहे जी आंतरराष्ट्रीय रोमिंगवर “ट्रूली अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग” फायदे देत आहे, ज्यामुळे कुटुंबे परदेशात असताना अखंड कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.
भारतात VI च्या पोस्टपेड आणि फॅमिली पोस्टपेड ग्राहकांची संख्या प्रचंड आहे. कुटुंबांना अगदी सहज कनेक्टेड राहता यावे, परदेशात प्रवास करताना अधिक बचत करता यावी यासाठी VI ने या उद्योगक्षेत्रात प्रथमच फॅमिली आयआर योजना आणली आहे, ज्यामध्ये सेकंडरी सदस्यांना आयआर पॅकवर विशेष सूट दिली जात आहे.
या योजनेंतर्गत VI फॅमिली पोस्टपेड प्लॅनमधील सेकंडरी सदस्यांना आयआर पॅकवर १०% सूट मिळेल, तर रेडएक्स फॅमिली युजर्सना आयआर पॅकवर २५% सूट मिळेल. तसेच या ऑफर्स २९९९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या १०, १४ आणि ३० दिवसांच्या पॅकवर लागू आहेत. VI चे फॅमिली पोस्टपेड प्लॅन ७०१ रुपयांपासून सुरु होतात, त्यामध्ये २ ते ५ सदस्यांचे पर्याय आहेत. त्याखेरीज VI ग्राहकांना आता त्यांच्या पोस्टपेड अकाउंटमध्ये प्रति सदस्य फक्त २९९ रुपयांमध्ये ८ सेकंडरी सदस्य जोडता येतात.
नुकतेच VI ने दोन सदस्यांसाठी दर महिन्याला फक्त १६०१ रुपयांमध्ये रेडएक्स फॅमिली प्लॅन प्रस्तुत केला आहे. हा अतिशय अनोखा प्लॅन असून यामध्ये सर्व कुटुंबियांना अनलिमिटेड डेटाला समान ऍक्सेस, इंटरनॅशनल रोमिंगचे लाभ आणि अतिशय लोकप्रिय प्रीमियम सेवांची श्रेणी यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल रोमिंग लाभांमध्ये दरवर्षी चार कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज ऍक्सेसेस, वर्षाला २९९९ रुपयांचा एक कॉम्प्लिमेंटरी ७ दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक आणि दुसऱ्या आयआर पॅकवर ७५० रुपयांची वार्षिक २५% सूट यांचा समावेश आहे, याचा वापर कोणीही सदस्य करू शकतात.
VI ने आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय रोमिंग (IR) पॅक युजर्ससाठी ४० रुपयांच्या लाखांचे प्रवास विमा संरक्षण फक्त २८५ रुपयांच्या आकर्षक किमतीत उपलब्ध करून देत आहे. हे देखील या उद्योगात पहिल्यांदाच उपलब्ध करवून देण्यात आले आहे. या योजनेमध्ये रुग्णालयात दाखल होणे, वैद्यकीय स्थलांतर, सामानाचे नुकसान किंवा विलंब, आणि सहलीतील अडथळे अशा अनेक परिस्थितींचा समावेश आहे. यामुळे परदेशात चिंतामुक्त प्रवासाचा अनुभव सुनिश्चित होतो. हे संरक्षण एकाच आंतरराष्ट्रीय सहलीच्या कालावधीसाठी वैध आहे, ज्यामध्ये एक प्रारंभ देश आणि एक गंतव्य देश समाविष्ट आहे.
आपल्या युजर्सना चिंतामुक्त प्रवास करता यावा यासाठी वी बांधील असून ब्ल्यू रिबन बॅग्सच्या सहयोगाने त्यांनी डिलेड बॅगेज प्रोटेक्शन देखील उपलब्ध करून दिले आहे. फक्त ९९ रुपयांमध्ये ही सुविधा मिळते, जर सामान हरवले किंवा पोचायला उशीर झाला तर वी पोस्टपेड आयआर ग्राहक प्रत्येक बॅगसाठी (दोन बॅग्सपर्यंत) १९,८०० रुपयांपर्यंत दावा करू शकतात.
कौटुंबिक युजर्ससाठी विशेष आयआर पॅक सूट, २८५ रुपयांमध्ये प्रवास विमा आणि सामान यायला उशीर झाल्यास संरक्षण यामुळे कुटुंबासोबत आंतरराष्ट्रीय प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव घेता येतो. भारतातून परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे, VI ची अनोखी योजना चिंतामुक्त कनेक्टिविटी आणि जागतिक प्रवाशांसाठी अधिक मूल्य प्रदान करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.






