ऑनलाईन ऍप्समधील व्हॉट्सऍप हे एक लोकप्रिय ऍप आहे. व्हॉट्सऍपवर आतापर्यंत जगभरातील लाखो लोक जोडलेली आहेत. येत्या काळात व्हॉट्सऍपमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यातच आता यावर आणखीन एक नवीन फिचर येणार असल्याचे समजले आहे.
नवीन व्हॉट्सॲप आणि मेटा एआय चॅटबॉटच्या सहकार्यामुळे आता व्हॉट्सॲपवर अनेक नवीन फीचर्स येतील. मिळालेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सऍप युजर्सना मेसेजिंग ॲपवर AI-जनरेट केलेले प्रोफाइल फोटो बनवण्याचा आणि वापरण्याचा ऑप्शन दिला जाणार आहे. नवीन AI वैशिष्ट्य भविष्यात दिसणाऱ्या अनेक ऍडिशनल फीचर्सपैकी एक असेल. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp AI-जनरेट केलेल्या प्रोफाइल फोटोंसाठी Android वर निवडक बीटा टेस्टर्ससह या फीचरची टेस्टिंग केली जात आहे.
नवीन AI फीचरच्या बीटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये क्रिएट एआय प्रोफाईल पिक्चर नावाचा नवीन सेक्शन असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शनच्या आधारित कोणत्याही प्रकारचे फोटो तयार करण्यासाठी तुम्ही मुळात AI टूल्स वापरू शकता.टिपस्टरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, AI-ऑपरेट प्रोफाइल फोटोंसह, यूजर्स युनिक आणि पर्सनलाइज़ फोटो तयार करू शकतात जे त्यांची पर्सनॅलिटी, इंटरेस्ट किंवा मूड अधिक अचूकपणे दर्शवू शकते.
व्हॉट्सॲपने प्रायव्हसीला ध्यानात घेऊन, लोकांना फोटो कॉपी करणे आणि कंटेनचा गैरवापर करणे खूप कठीण केले आहे. तुम्ही मेसेजिंग ॲपने iOS आणि Android या दोन्ही व्हर्जन्सवर प्रोफाइल फोटो, जनरल फोटो किंवा व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. व्हॉट्सॲपवर मेटा साठी वेगळा आयकॉन दिसू लागला आहे. यूजर्स नवीन रेसिपी तयार करण्यासाठी, डायट प्लान तयार करण्यासाठी आणि विविध प्रश्न विचारण्यासाठी आता चॅटबॉटचा वापर करू शकतात.
[read_also content=”Google Payचं नवीन फिचर, आता बँक खात्यात पैसे नसले तरी पेमेंट करता येणार https://www.navarashtra.com/technology/new-feature-of-google-pay-now-payment-can-be-made-even-if-there-is-no-money-in-the-bank-account-537925.html”]
स्टेटस पोस्ट करण्याची पद्धत बदलेल…
यापूर्वी असे सांगण्यात आले होते की, व्हॉट्सॲप ॲपमध्ये स्टेटससाठी 1 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ शेअर करण्याचे फिचर सुरु होत आहे आणि सध्या ते काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. तथापि, WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील अपडेटद्वारे काही यूजर्सना हे फिचर मिळू शकते. WB ने म्हटले आहे की, हे iOS 24.10.10.74 अपडेटमध्ये दिले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधी स्टेटसची लांबी 30 सेकंदांपर्यंत मर्यादित होती, परंतु आता ते दुप्पट केले जाईल असे सांगण्यात आले आहे, त्यामुळे आता यूजर्स 1 मिनिटाचा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट करू शकतील.