Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

Social Media Ban: लहान मुलांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक देशांनी लहान मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता न्यूझीलंड सरकार देखील असाच एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 09:23 AM
१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? 'या' देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? 'या' देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

Follow Us
Follow Us:
  • विधेयक मंजूर झाल्यास १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध येऊ शकतात.
  • नियम मोडणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांना जागतिक महसुलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो.
  • मुलांचे वय तपासण्यासाठी डिजिटल ओळखपत्र, चेहऱ्याद्वारे वयाचा अंदाज किंवा अधिकृत कागदपत्रांचा वापर केला जाऊ शकतो.
न्यूझीलंड सरकारने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने ‘ऑनलाइन सेफ्टी बिल’ संसदेत सादर केले आहे. ऑनलाइन छळ, व्यसनाधीन करणारे अल्गोरिदम आणि सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यापासून मुलांचे संरक्षण करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

या विधेयकानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेटा, टिकटॉक आणि स्नॅपचॅटसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या जागतिक महसुलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. प्लॅटफॉर्मना वापरकर्त्यांचे वय १६ वर्षपिक्षा अधिक आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी डिजिटल आयडी, चेहऱ्याच्या आधारे वयाचा अंदाज, विद्यमान अकाउंट डेटा किंवा अधिकृत कागदपत्रांचा वापर करावा लागू शकतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांची असेल. मुलांवर किंवा त्यांच्या पालकांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, असे शिक्षणमंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य – AI Created) 

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणणारा कायदा लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांनी अशाच प्रकारचे कायदे लागू केले आहेत किंवा त्याबाबत ठोस प्रस्ताव पुढे आणले आहेत. न्यूझीलंडचा प्रस्ताव मंजूर झाल्यास, मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणणाऱ्या देशांच्या यादीत त्यांची भर पडेल.

किमान पाच तास सोशल मीडियावर

न्यूझीलंडच्या मुलांच्या संपूर्ण पिढीवर होणारे नुकसान सरकार स्वीकारू शकत नाही. १३ ते १७ वयोगटातील प्रत्येक तीन मुलांपैकी एक मूल दररोज किमान पाच तास सोशल मीडियावर घालवते. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन, शिक्षण आणि झोप प्रभावित होत आहे. – क्रिस्टोफर लक्सन, पंतप्रधान, न्यूझीलंड

इंडोनेशिया

१६ वर्षांखालील मुलांसाठी आठ उच्च-जोखीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट निष्क्रय करण्याची तरतूद आहे. वय पडताळणी आणि पालकांचे नियंत्रण अनिवार्य करण्यात आले असून, हा नियम २८ मार्च २०२६ पासून लागू आहे.

ब्राझील

१६ वर्षांखालील मुलांचे अकाउंट कायदेशीर पालकाशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. अकाउंट थेट बंद केले जाणार नसले तरी पालकांशी लिंक करणे आवश्यक आहे. हा कायदा १७ मार्च २०२६ पासून लागू आहे.

मलेशिया

१६ वर्षांखालील मुलांना परवानाधारक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करण्यास बंदी आहे. पासपोर्ट किंवा डिजिटल आयडीद्वारे वयाची पडताळणी करावी लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास २५ लाख डॉलरपर्यंत दंड होऊ शकतो. हे नियम १ जून २०२६ पासून लागू झाले आहेत.

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

फ्रान्स

१५ वर्षांखालील मुलांना नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. अकाउंट्सना १ जानेवारी २०२७ पर्यंत क्य पडताळणीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, फ्रान्सच्या घटनात्मक परिषदेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत कायदा रोखला. आता सस्कार नव्या मसुद्यावर काम करत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: New zealand social media ban under 16 new bill proposes restrictions and 10 percent fine for companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
1

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
2

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
3

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
4

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.