
RCB फॅन्ससाठी Nothing चे अनोखे सरप्राईज! लवकरच लाँच होणार स्पेशल एडीशन स्मार्टफोन; डिझाईन पाहून व्हाल फिदा
WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड नथिंग आणि आयपीएल फ्रेंचाइजी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु यांचे नाते आता आणखी मजबूत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2025 च्या टी20 सीजनमध्ये नथिंग आरसीबीचे एसोसिएट स्पॉन्सर होते. 2026 च्या या सिझनमध्ये नथिंग आरसीबीचे टाइटल स्पॉन्सर बनले आहे. हाच प्रवास, दोघांमधील मजबूत नाते आणि ऐतिहासिक विजय अविस्मरणीय व्हावा, यासाठी कंपनीने एक स्पेशल एडीशन स्मार्टफोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. नथिंगचे को-फाउंडर आणि इंडिया प्रेसिडेंट अकिस इवेंजलिडिस यांचे असं म्हणणं आहे की, हा फोन आरसीबीचे चाहते आणि आमच्या कम्युनिटीसाठी एक खास भेट असणार आहे. (फोटो सौजन्य: X)
स्पेशल एडीशन स्मार्टफोन कंपनीच्या नवीन सिरीजचा भाग आहे. या नवीन सिरीजला कंपनीने “b” सीरीज असे नाव दिले आहे. कंपनीच्या बेस्ट-सेलिंग Phone (4a) सीरीजच्या यशानंतर आता नथिंग एका नव्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहे. नवीन ‘b’ सीरीजचा मुख्य उद्देश नवीन पिढीच्या यूजर्सपर्यंत नथिंगच्या प्रीमियम आणि यूनिक स्मार्टफोन अनुभव पोहोचवण्याचा आहे. नथिंगने स्पष्ट केलं आहे की, या नवीन स्मार्टफोनचा लूक आणि याचा यूजर इंटरफेस तरूणांचा विचार करून अतिशय कूल बनवले आहे.
जर तुम्हाला नवीन आरसीबी स्पेशल एडिशन फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला उत्साह दाखवावा लागेल. Nothing Phone (4b) RCB Edition एक कलेक्टिबल प्रोडक्टच्या रुपात सादर केले जाणार आहे, ज्याचा स्टॉक मर्यादित असणार आहे. हा फोन 7 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता अधिकृतपणे लाँच केला जाणार आहे. यानंतर, संध्याकाळी 4 वाजल्यापासून बंगळुरुमधील नथिंग स्टोअरमध्ये एका एक्सक्लूसिव वन-डे ड्रॉपद्वारे या स्पेशल एडीशन स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, या स्मार्टफोनची विक्री ‘आधी येईल त्याला प्राधान्य’ या आधारावर असणार आहे. म्हणजेच ज्याचा नंबर सर्वात आधी असेल त्याला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.