Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uber App Metro Ticket: तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! ‘उबर ॲप’वर मुंबई मेट्रोचे तिकीट; प्रवासाची सोय वाढली

दिल्ली आणि चेन्नईमध्ये ही सेवा यशस्वी झाल्यानंतर, Uber, मुंबई मेट्रो वन (Mumbai Metro One) आणि ओएनडीसी नेटवर्क (ONDC Network) यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आता मुंबईत राबवण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 06, 2025 | 08:59 PM
तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! 'उबर ॲप'वर मुंबई मेट्रोचे तिकीट (Photo Credit - X)

तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! 'उबर ॲप'वर मुंबई मेट्रोचे तिकीट (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रवासाची सोय वाढली
  • Uber ॲपवर मेट्रोचे तिकीट!
  • दिल्ली, चैन्नईचा ‘यशस्वी फॉर्म्युला’ आता मुंबईतही लागू

मुंबई: मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे! आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना ‘Uber ॲप’मध्येच तिकीट शोधणे आणि थेट खरेदी करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काऊंटरवरील लांब रांगा आणि तिकिटिंगचा त्रास पूर्णपणे टाळता येणार आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये ही सेवा यशस्वी झाल्यानंतर, Uber, मुंबई मेट्रो वन (Mumbai Metro One) आणि ओएनडीसी नेटवर्क (ONDC Network) यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आता मुंबईत राबवण्यात आला आहे.

तिकीट बुकिंगची सोपी प्रक्रिया

Uber ॲपवर मेट्रो तिकीटिंग उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना कमी प्रतीक्षा, कमी त्रास आणि अधिक सोयीस्कर प्रवास करणे शक्य होणार आहे. Uber इंडिया आणि दक्षिण आशियाचे (कन्झ्युमर ग्रोथ डायरेक्टर) शिवा शैलेन्द्रन यांनी सांगितले की, शहरी प्रवास पूर्णपणे ‘एंड-टू-एंड’ प्लॅनिंगपासून पेमेंट आणि प्रत्यक्ष प्रवासापर्यंत करण्याच्या आमच्या ध्येयातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लक्षात ठेवा: मेट्रो तिकिटांसाठी पेमेंट फक्त यूपीआय (UPI) मार्फतच स्वीकारले जाणार आहे.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार

भविष्यातील सोयीसुविधा

तिकिटिंग व्यतिरिक्त, Uber ॲपवर लवकरच प्रवाशांना खालील सुविधा उपलब्ध होणार आहेत:

  • रिअल टाईम (Real Time) सेवा अपडेट्स
  • स्टेशन माहिती
  • मार्ग नियोजन (Route Planning) सुविधा

यामुळे प्रवाशांना आपला प्रवास अधिक सुटसुटीत आणि कार्यक्षमपणे नियोजित करता येईल.

डिजिटल भारताची क्षमता

ओएनडीसी नेटवर्कचे (Open Network for Digital Commerce) वरिष्ठ कार्यकारी संचालक नितीन नायर यांनी सांगितले की, ONDC नेटवर्कद्वारे Uber ॲपवर मेट्रो तिकीटिंग इंटिग्रेशन हे भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची (Digital Public Infrastructure) क्षमता दर्शवते. “दिल्ली आणि चेन्नईनंतर, आता मुंबईकरांसाठी Uber वर इन-ॲप मेट्रो तिकीटिंग उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी ओपन डिजिटल इकोसिस्टम आणखी मजबूत होईल,” असेही ते म्हणाले.

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Web Title: Now metro tickets can be booked directly from the uber app great convenience for passengers on the versova ghatkopar route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai
  • travel news

संबंधित बातम्या

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार
1

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
2

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Devnar Power Project: कचरा आणि वीज संकट दोन्हीवर उतारा! १०२० कोटींचा देवनार प्रकल्प मे २०२६ मध्ये कार्यान्वित
3

Devnar Power Project: कचरा आणि वीज संकट दोन्हीवर उतारा! १०२० कोटींचा देवनार प्रकल्प मे २०२६ मध्ये कार्यान्वित

Mumbai: मुंबई विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई! १३ कोटींचं ड्रग्स आणि ८७ लाखांचं परकीय चलनाचा मोठा साठा जप्त
4

Mumbai: मुंबई विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई! १३ कोटींचं ड्रग्स आणि ८७ लाखांचं परकीय चलनाचा मोठा साठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.