Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

WhatsApp On iPad: आयपॅड यूजर आहात का? व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वारंवार क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो? आता चिंता करू नका. व्हॉट्सॲप आयपॅड यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर घेऊन आले आहे. हे फीचर यूजर्ससाठी मोठ्या प्रमाणात फायद्याचे ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 12:11 PM
WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • नवीन अपडेटनंतर आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज राहणार नाही.
  • यूजर्स आता मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने थेट आयपॅडवर व्हॉट्सॲप अकाउंट रजिस्टर करू शकतील.
  • प्रायमरी डिव्हाईस सपोर्टमुळे लाईव्ह लोकेशन, ब्रॉडकास्ट लिस्ट आणि इतर फीचर्सचा अधिक सहज वापर करता येणार आहे.
WhatsApp New Update: तुम्हाला देखील आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरताना सतत क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲपने आता अखेर आयपॅड यूजर्ससाठी एक बहुप्रतिक्षित अपडेट रोलआऊट केलं आहे. आता तुम्हाला आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी आयफोन किंवा अँड्रॉईड फोनची गरज पडणार नाही. तसेच व्हॉट्सॲप वापरण्यासाठी क्यूआर कोड देखील स्कॅन करावा लागणार नाही. आता यूजर्स थेट आयपॅडवरून व्हॉट्सॲप अकाऊंट रजिस्टर करू शकणार आहेत.

Tech Tips: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या घरातील AC ची काळजी! वीजबिलही होईल कमी… वापरा या सोप्या ट्रिक्स

काय आहे व्हॉट्सॲपचे नवीन अपडेट?

व्हॉट्सॲपने आयपॅड यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हे फीचर आयपॅडओएसच्या लेटेस्ट वर्जन 26.25.74 वर मिळणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲप वापरताना आयपॅड केवळ ‘कंपॅनियन मोड’ मध्ये काम करत होता. म्हणजे तुम्हाला फोनमध्ये लिंक करून आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरावा लागत होता. मात्र आता नवीन अपडेट रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स व्हॉट्सॲप वापरण्यासाठी त्यांच्या आयपॅडला प्रायमरी डिव्हाईस बनवू शकता. म्हणजेच आयफोन किंवा अँड्रॉईडशिवाय थेट आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)

कंपॅनियन मोडमध्ये कोणत्या समस्या होत्या?

कंपॅनियन मोडमध्ये अनेक मर्यादा होत्या. जसे, यूजर्स आयपॅडवरून त्यांचे लाईव्ह लोकेशन कोणासोबत शेअर करू शकत नव्हते. याशिवाय ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यात किंवा पाहताना अडचण येत होती. सर्वात मोठी समस्या म्हणजेच आयपॅडमध्ये व्हॉट्सॲप वापरताना जर तुम्ही 14 दिवसांपर्यंत तुमच्या मुख्य फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन केले नाही. तर आयपॅडमधून व्हॉट्सॲप आपोआप लॉगआऊट केले जात होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता यूजर्स आयपॅडला प्रायमरी डिव्हाईस म्हणून सेट करू शकणार आहेत. यामुळे कंपॅनियन मोडमधील मर्यादांचा सामना करावा लागणार नाही. आयपॅडमधून लाईव्ह लोकेशन शेअर केले जाऊ शकते. तसेच ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर केला जाऊ शकतो आणि बिजनेस अकाउंट्ससोबत देखील संभाषण करू शकता.

आयपॅडमध्ये प्रायमरी व्हॉट्सॲप कसे चालू करावे?

आयपॅडमध्ये नवीन व्हॉट्सॲप अपडेट सेटअप करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. ही प्रोसेस अगदी फोनमध्ये व्हॉट्सॲप वापरण्यासारखीच आहे.

  • सर्वात आधी तुमच्या आयपॅडवर व्हॉट्सॲप ओपन करा.
  • आता कंट्री कोड आणि मोबाईल नंबर एंटर करा.
  • आता तुमच्या नंबरवर आलेला 6 डिजिटचा व्हेरिफिकेशन कोड एंटर करा.
  • जर तुम्ही पासकी सेट केली असेल तर तुम्ही कोडशिवाय देखील लॉगिन करू शकता.
संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज…

तुम्हाला कधी मिळणार नवीन फीचर?

व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर सध्या काही मर्यादित यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट करणार आहे. येत्या काही आठवड्यांत एका अपडेटद्वारे हे तुमच्या आयपॅडवरही उपलब्ध होईल, त्यामुळे ॲप स्टोअर तपासत राहा.

Web Title: Now you can use whatsapp on ipad without qr code scan new update is rolling out for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी
1

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद
3

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत
4

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.