Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत… ग्राहकांची नाराजी वाढली

OnePlus Smartphone Price Hike: वनप्लसने पुन्हा एकदा ग्राहकांना किंमतवाढीचा धक्का दिला आहे. कंपनीने अवघ्या काही दिवसांतच OnePlus Nord 6 स्मार्टफोनची दुसऱ्यांदा किंमत वाढवल्याने यूजर्समध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनची नवीन किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 11:26 AM
नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत... ग्राहकांची नाराजी वाढली

नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत... ग्राहकांची नाराजी वाढली

Follow Us
Follow Us:
  • वनप्लसने अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे.
  • स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत पुन्हा 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
  • स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर आणि 9,000mAh बॅटरीसह वनप्लस नॉर्ड 6 प्रीमियम फीचर्स ऑफर करतो.
OnePlus Nord 6 Price Hike: टेक कंपनी वनप्लसने अलीकडेच नॉर्ड सीरीजमधील OnePlus Nord 6 भारतात लाँच केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन जेव्हा भारतात लाँच केला तेव्हा त्याची किंमत 40 हजार रुपयांहून कमी होती. मात्र आता कंपनी या स्मार्टफोनची किंमत सतत वाढवत आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी घोषणा करत कंपनीने या स्मार्टफोनची नवीन किंमत जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने या स्मार्टफोनची किंमत वाढवली असल्याचे समोर आले आहे.

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

कंपनीने सुमारे आठवडाभरातच या स्मार्टफोनची किंमत दोनवेळा वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टिपस्टर संजू चौधरीने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, कंपनीने यावेळी OnePlus Nord 6 स्मार्टफोनच्या दोन्ही स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सुमारे 1 हजार रुपयांनी वाढवली आहे. तुम्ही जर हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी नवीन किंमत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – OnePlus)

वनप्लस नॉर्ड 6 ची नवी किंमत

वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँचिंग किंमत 38,999 रुपये होती. त्यानंतर कंपनीने अलीकडेच किंमत वाढवल्याने या व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली असून हा हे बेस व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 42,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर 12GB + 256GB व्हेरिअंट 41,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कंपनीने या व्हेरिअंटची किंमत 46,999 रुपयांपर्यंत वाढवली. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 47,999 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस व्हेरिअंटची किंमत आतापर्यंत 4 रुपयांनी आणि दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या किंमती वाढल्याने ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने सुमारे आठवडाभरातच दोनदा स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

वनप्लस नॉर्ड 6 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंगसह 9,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे.

यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी यामध्ये OIS सह 50MP चा सोनी LYT-600 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 मिळणार आहे.

Web Title: Oneplus increases nord 6 price again within a week users express disappointment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone charger
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.